बेळगाव लाईव्ह : विविध विकास कामांच्या उद्घाटन आणि पाहणी करता रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना
सोमवार 15 सप्टेंबर रोजी बेळगाव दौऱ्यावर येणार आहेत.
सोमवारी अनगोळ चौथा गेट आणि खानापूर रेल्वे गेट येथे रोड अंडर ब्रिजचे भूमिपूजन होणार आहे यासाठी रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना विशेष ट्रेनने बेळगावला येतील, दुपारी ३ वाजता बेळगावच्या चौथ्या रेल्वे गेटवर आरयूबीची पायाभरणी करतील.
आणि त्यानंतर एलसी ३६० उड्डाणपुलाची पायाभरणी करण्यासाठी आणि प्रवासी सुविधांची पाहणी करण्यासाठी खानापूरला जातील. त्यापूर्वी, दुपारी १:४५ च्या सुमारास, ते बेळगाव रेल्वे स्थानकाची तपासणी पूर्ण केल्यानंतर एलसी गेट क्रमांक ३८२ (टिळकवाडी गेट क्रमांक २) ची पाहणी करतील अशी अपेक्षा आहे.
बेळगाव रेल्वेशी संबंधित विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी रेल्वे राज्यमंत्री बेळगाव मध्ये येत आहेत. खानापूर आणि बेळगाव मधील दोन्ही कार्यक्रमाला बेळगाव जिल्ह्यातील मंत्री आमदार खासदार उपस्थित राहणार आहेत.


