बेळगाव लाईव्ह : आगामी दिवसात होणाऱ्या जातीय जनगणनेत मराठा समाजाने आपली नोंद कशा पद्धतीने करावी याचे मार्गदर्शन करण्यासाठी सकल मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.
सोमवार दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी सकल मराठा समाज बेळगाव यांच्यावतीने जत्तीमठ ,रामलिंगखिंड गल्ली, बेळगाव येथे संध्याकाळी 5 वाजता मराठा समाजातील सर्व घटकांना आमंत्रित करण्यात येत आहे.
लवकरच कर्नाटक राज्यात जनगणना होत आहे, या जनगणनेत मराठा समाजाने आपली नोंद कशा पद्धतीने करावी यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर बेळगाव आणि बेळगाव परिसरातील मराठा समाजाला कशा पद्धतीने आपले नाव जनगणनेत नोंद करावी, आणि ही नोंद करताना मराठा समाजातील नागरिकांनी कोणत्या रकान्यापुढे आपली नोंद करणे गरजेचे आहे हे समजावून सांगण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे, त्यासंबंधी निर्णय घेण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आलेली आहे.
समाजातील तरुणाईच्या हितासंबंधी जागृती करणे गरजेचे आहे त्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे मराठा समाज बांधवांनी या बैठकीसाठी हजर राहावे अशी आवाहन प्रकाश मरगाळे ,किरण जाधव ,नागेश देसाई सकल मराठा समाज बेळगाव यांचे मार्फत करण्यात आले आहे.



