बेळगाव लाईव्ह :श्री मलप्रभा सहकारी साखर कारखाना नियमित एम. के. हुबळीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकी निमित्त येत्या शनिवार दि. 27 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून सोमवार दि. 29 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत कित्तूर तालुक्यातील एम. के. हुबळी, होस काद्रोळी आणि खानापूर तालुक्यातील इटगी गावाच्या व्याप्तीतील दारू दुकाने व बार, त्याचप्रमाणे मद्य निर्मिती केंद्र बंद ठेवण्यात येतील, असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला आहे.
कित्तूर तालुक्यातील एम. के. हुबळी तेथील श्री मलप्रभा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक येत्या रविवार दि. 28 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे.
कारखान्याच्या आवारात होणाऱ्या या निवडणूक प्रक्रियेमध्ये सुमारे 17,000 मतदार सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामुळे निवडणूक स्थळी मतदारांची प्रचंड गर्दी होणार आहे.
या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कारखान्याच्या आसपास असणाऱ्या कित्तूर तालुक्यातील एम. के. हुबळी, होस काद्रोळी आणि खानापूर तालुक्यातील इटगी गावाच्या व्याप्तीतील सर्व दारू दुकाने आणि बार, तसेच मद्य निर्मिती केंद्र शनिवार दि. 27 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून सोमवार दि. 29 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत बंद राहतील, असा आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बजावला आहे.


