बेळगाव लाईव्ह :भारतातील 14 कोटी ज्येष्ठ नागरिक हे देशाची शान आहेत त्यामुळे त्यांना राष्ट्रीय संपत्ती घोषित करा अशी आग्रही मागणी किशोर काकडे यांनी केली.
ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रातर्फे आयोजित कार्यक्रमात काकडे फौंडेशनचे अध्यक्ष किशोर काकडे हे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.अर्थक्रांतीचे प्रणेते विद्वान अनिल बोकील यांच्या विचारावर आधारित हे विचार ते मांडत होते.
श्री. काकडे पुढे म्हणाले की ज्येष्ठ नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा आवश्यक आहे.आम्ही साठ वर्षे देशाला दिली आहेत, आजची पिढी आम्ही दिली आहे. आता सरकारने पेन्शनधारक व श्रीमंतांना वगळून सर्व ज्येष्ठ नागरिकांना विशेष योजना जाहीर करून दहा हजार रूपये गौरव धन द्यावे तसेच कोणत्याही छोट्या देशाची लोकसंख्या ठरेल इतके चौदा कोटीहून अधिक ज्येष्ठ नागरिक आज भारतात आहेत म्हणून एक वेगळे मंत्रालय स्थापन करावे अशी मागणी केली. उपाध्यक्ष के.एल.मजूकर यानीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी संजीवनी फौडेशनचे अध्यक्ष मदन बामणे यांनी 7 ऑक्टोबर रोजी होणा-या ज्येष्ठ नागरिक दिनाविषयी माहिती देऊन गायन व नृत्य स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन केले. पत्रकार सदानंद सामंत यावेळी उपस्थित होते.
सहकार्यवाह शिवराज पाटील यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली तर विठ्ठल पोळ यांनी आभार मानले . कार्यवाह सुरेंद्र देसाई यांनी स्वागत
केले.प्रारंभी सदाशिव कुलकर्णी यांनी प्रार्थना सादर केली.विजय वाईंगडे, जगमोहन आगरवाल, गिरिजा कुलकर्णी, योगिनी देसाई, अशोक कदम, रविंद्र कुंभोजकर,अवधूत शेट्ये, यानी मराठी,हिंदी भक्तीगीत, भावगीत, सिनेमातील गीते सादर केली.



