बेळगाव लाईव्ह : टिळकवाडी येथील काँग्रेस रोडवर झालेल्या रस्त्या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीस वेळेत सामाजिक कार्यकर्त्यांनी मदत केल्याने त्याचा जीव वाचण्यास मदत झाली आहे.
मंगळवारी 23 रोजी रात्री 10 वाजता बेळगाव शहरातल्या काँग्रेस रोडवर हा अपघात झाला होता.
कॉंग्रेस रोड, टिळकवाडी येथील अरुण थिएटरसमोर मोठा अपघात झाला चारचाकी वाहनाची दुचाकीशी धडक होऊन दुचाकीवरील मागील प्रवासी गंभीर जखमी झाला होता.
जखमी व्यक्तीची ओळख दादासाहेब पाटील अशी झाली असून ते गणेशपूर येथील सिंडिकेट बँक कॉलनीत राहतात. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत तसेच फ्रॅक्चर झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारांची गरज होती त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर भारतीय सैन्याचे निवृत्त सुबेदार सुधाकर चाळके यांनी अपघातग्रस्ताला पाहून त्वरित मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी तत्काळ 108 व 112 आपत्कालीन सेवांना संपर्क साधून मदत मागवली.
काही वेळातच 108 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. जखमीला प्राथमिक उपचार देऊन विजय ऑर्थो हॉस्पिटल येथे हलविण्यात आले. या दरम्यान चाळके आणि दरेकर यांनी रुग्णासोबत राहून सातत्याने मदत केली.
वेळीच झालेल्या हस्तक्षेपामुळे आणि समन्वयामुळे दादासाहेब पाटील यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.



