केवळ पाच तासांत खून प्रकरणाचा छडा

0
1
 belgaum

बेळगाव लाईव्ह : सदाशिवनगर बेळगाव येथील लक्ष्मी कॉम्प्लेक्स जवळ धारधार शस्त्राने वार करून महिलेचा करण्यात आलेल्या खून प्रकरणाचा छडा केवळ ५ तासांत लावत आरोपीना गजाआड करण्याचे काम ए पी एम सी पोलिसांनी केले आहे.

मंगळवारी सकाळी सदाशिवनगरमधील लक्ष्मी कॉम्प्लेक्सजवळ महादेवी करेन्नवर या महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता त्यानंतर बेळगाव पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत या खून प्रकरणाचा उलगडा केला आहे. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी बुधवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत सदर खून प्रकरणाची माहिती माध्यमांना दिली. उसने घेतलेले पैसे परत न दिल्याने का खून झाला आहे. पोलीस आयुक्तांनी सांगितले कि मेसमध्ये स्वयंपाकाचे काम करणाऱ्या श्रीमती महादेवी बागप्पा करियन्नवर (वय 42, रा. सदाशिव नगर, 1ला क्रॉस, बेळगाव) यांच्याशी ओळख असलेला आरोपी संतोष थावरू जाधव (वय 38, रा. श्रीनगर, बेळगाव) याने दीड वर्षांपूर्वी त्यांच्याकडून कर्जाच्या रूपात 10,000 रुपये घेतले होते. सदर रक्कम परत मागितल्याने वारंवार त्रास देणाऱ्या आरोपीने याच कारणावरून काल, दिनांक 05 मंगळवारी रात्री 11:09 वाजता, सदाशिव नगरातील इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळील रस्त्यावर श्रीमती महादेवी यांच्याशी वाद घालून लोखंडी रॉडने डोक्यावर मारहाण करून त्यांचा खून केला आणि पळून गेला होता.

डी सी पी नारायण बरमानी, बेळगाव शहर यांच्या मार्गदर्शनाखाली, मार्केट उपविभागाचे एसीपी संतोष सत्यनाइक, सहाय्यक पोलीस आयुक्त, मार्केट उपविभाग, बेळगाव यांच्या नेतृत्वाखालील दोन स्वतंत्र पथकांनी, ज्यात यू. एस. अवटी, पी.आय., एपीएमसी ठाणे आणि जे. एम. कालमिर्ची, पी.आय., माळमरुती पोलीस ठाणे यांचा समावेश होता त्यांनी तपास करून त्वरित कारवाई करत खून झाल्याच्या 5 तासांत पळून गेलेल्या आरोपीला पकडण्यात यश मिळवले. आरोपीला अटक करून खूनासाठी वापरलेला लोखंडी रॉड जप्त करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे.

 belgaum

या प्रकरणाचा त्वरित तपास करून यशस्वीपणे उकल करणाऱ्या संतोष सत्यनाइक, एसीपी, मार्केट, यू. एस. अवटी, पी.आय., एपीएमसी, जे. एम. कालमिर्ची, पी.आय., माळमरुती, तसेच एस. आर. मुत्तत्ती, पी.एस.आय., एपीएमसी, होन्नप्पा तळवार, पी.एस.आय., माळमरुती ठाणे, हुसेन केरूर, पी.एस.आय., मार्केट ठाणे आणि एपीएमसी ठाण्याचे कर्मचारी एम. ए. पटेल, ए.एस.आय., बी. एम. नरगुंद, सी.एच.सी., व्ही. डी. बाबानगर, सी.एच.सी., गोविंद पूजारी, सी.पी.सी., नामदेव लमाणी, माळमरुती ठाण्याचे मारुती कुरेर, सी.एच.सी., गोविंद लमाणी, सी.पी.सी., पारूक मयूर, सी.पी.सी., आणि मार्केट ठाण्याचे मुत्तू बम्मनाळ, कार्तिक जी. एम. यांच्या पथकाचे बेळगाव शहराचे मान्यवर पोलीस आयुक्त आणि डीसीपी यांनी कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.