बेळगाव लाईव्ह: दोन दिवसापूर्वी खानापूर शहरात झालेल्या सूरी प्रकरणाचा पर्दाफाश करताना पोलिसांनी दोन वेगवेगळ्या घरपोडी प्रकरणात दोन आरोपींना अटक केले आहे.
रोहन नागेंद्र मातंगी, रा. हलकर्णी, ता. खानापूर, ह.मु. खानापूर रोड, मच्छे बेळगाव
शिवनागय्या मुत्तय्या उमचगिमठ, रा. गुजमागडी, ता. रोन, जि. गदग, ह.मु. 1ला क्रॉस, जयनगर, विद्यानगर, हुबळी अशी या दोन्ही आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिले प्रकरण 20 एप्रिल 2025 रोजी सकाळी 7.30 वाजेपासून 21 एप्रिल 2025 रोजी सकाळी 7.30 वाजेपर्यंत घडले. मराठा मंडळ डिग्री कॉलेजसमोर राहणाऱ्या श्रीमती रेखा तुकाराम क्षीरसागर यांच्या घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी 60.05 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले होते.
दुसरे प्रकरण 7 जून 2025 रोजी सायंकाळी 5.30 ते 9 जून 2025 रोजी सकाळी 6.30 या काळात घडले. शिवाजीनगर, खानापूर येथे राहणारे राचण्णा चन्नबसप्प किनगी यांच्या घरातून चोरट्यांनी 26 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 210 ग्रॅम चांदीचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी गुन्हा क्रमांक 140/2025 दाखल झाला होते.
या दोन्ही प्रकरणांच्या तपासासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक भिमाशंकर गुलेद (IPS), अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रुती एन.एस., अतिरिक्त पोलीस अधीक्षक रामगोंडा बसरगी व उपविभागीय पोलीस अधिकारी वीरय्या हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली, खाणापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक एल.एच. गौंडी यांच्या नेतृत्वाखाली पथके तयार करण्यात आली.
पोलिसांनी दोन्ही प्रकरणात या दोघांना 9 ऑगस्ट 2025 रोजी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही कारवाई करताना PSI मलकणगौडा बिरादर (काय.सु.), PSI (ह) ए.ओ. निरंजन, बी.जी. यलिगार, जे.आय. काद्रोळी, एस.व्ही. कमकेरी तसेच खानापूर पोलीस ठाण्याचे इतर कर्मचारी आणि जिल्हा टेक्निकल सेलचे विनोद टक्कण्णवर व सचिन पाटील यांनी विशेष मेहनत घेतली.या यशस्वी कारवाईबद्दल बेलगाव जिल्हा पोलीस प्रमुखांनी समाधान व्यक्त करून संबंधित अधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे.



