बेळगाव लाईव्ह : फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला पैसे तसेच किमती साहित्य नेताना अडवून चाकू दाखवत त्याच्याकडून रोख रक्कम व टॅब लंपास करण्यात आला होता याप्रकरणी नेसरगी पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती.
यामधील दोघा संशयितानी सहावे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाकडे जामीनसाठी अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर सुनावणी होऊन त्या दोघा संशयताना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
इराप्पा महादेव पावडी(मूळ. हणंबरहट्टी सध्या रा. वाल्मिकी गल्ली उद्यमबाग बेळगाव, रामाप्पा उर्फ रमेश बाळाप्पा हल्लबण्णावर( मुळ. सन्नकुंपी सध्या रा. राजकट्टी ता. हुक्केरी) अशी जामीन मंजूर झालेल्यांची नावे आहेत. या दोघांनी फिर्यादी राजू आडव्याप्पा शिवबसणावर रा. (बुदरकट्टी, ता. बैलहोंगल) याल दि. 5 जानेवारी सकाळी १०.३०च्या सुमारास तो एका फायनान्सची रक्कम घेऊन बँकेत जमा करण्यासाठी जाता होता. यावेळी त्यांच्याकडे 29 हजार 70 रुपये व एक टॅब होता.
दोन दुचाकीवरून आलेल्या या चार भामट्यानी सन्नकुंपी वन्नुर रोडवर त्यांना अडविले. त्याला चाकूचे धाक दाखविले व रक्कम आणि टॅब काढून घेतला. ही लूट करताना या सर्वांनी तोंडाला मास्क घातला होता. या घटनेनंतर घाबरलेल्या फिर्यादी राजू यांनी नेसरगी पोलिस स्थानकात जाऊन फिर्याद दाखल केली.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता या दोघांसह आणखी तिघे या कटामध्ये सामील असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या सर्वांना १ऑगस्ट रोजी अटक केली. या सर्वांना न्यायालयात हजर केले असता त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली होती.
या दोघांनी न्यायालयात जामीन साठी अर्ज दाखल केला होता त्या ठिकाणी सुनावणी होऊन एक लाख रुपयांचे हमीपत्र आणि तितक्याच रकमेचा एक जामीनदार यासह इतर अटी घालून न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. या दोघांच्या वतीने अॅड शामसुंदर पत्तार, अॅड हनुमंत कनवी, अॅड. मारुती कामाण्णाचे यांनी काम पाहिले.




