बेळगाव लाईव्ह :बेळगाव पोलिसांनी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या बरोबरच सेवन करणाऱ्यांविरुद्धही कारवाई सुरू केली असून अंमली पदार्थाच्या नशेत असलेल्या एकाला काल वीरभद्रनगर येथे मार्केट पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव तौफिक शब्बीर अहमद गोरीखान (वय 38, रा. वीरभद्रनगर, बेळगाव) असे आहे.
तौफिक हा काल सोमवारी वीरभद्रनगर 7वा क्रॉस येथे संशयास्पद अवस्थेत वावरत असताना मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हवन्नवर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याची चौकशी केली.
त्यावेळी प्रत्यक्षदर्शी तौफिकने कोणत्यातरी अंमली पदार्थाचे सेवन केल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी त्याला जागीच अटक केले. याप्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.


