बेळगाव लाईव्ह :मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समर्थनगर सातवा क्रॉस येथे सार्वजनिक ठिकाणी हेरॉईन या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या तिघा जणांना मार्केट पोलिसांनी अटक करून त्यांच्या जवळील 48 हजार 400 रुपये किमतीचे 60.36 ग्रॅम हेरॉईन आणि एक ऑटो रिक्षा असा एकूण 1 लाख 48 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे अनिकेत रामा लोहार (वय 27, रा. समर्थनगर बेळगाव), अल्तमश आयुबसाब पठाण (वय 25, रा. जयनगर, मच्छे बेळगाव) आणि सद्दामहुसेन सरदार पठाण (वय 24, रा. टिपू सुलताननगर मच्छे बेळगाव) अशी आहेत.
हे तिघेजण काल रविवारी समर्थनगर सातवा क्रॉस येथे सार्वजनिक ठिकाणी हेरॉईन या अंमली पदार्थाची विक्री मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हुसेनसाब केरुर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने धाड टाकून तिघांनाही ताब्यात घेतले.
त्यांच्याकडील त्यांच्या जवळील 48 हजार 400 रुपये किमतीचे 60.36 ग्रॅम हेरॉईन आणि एक 1 लाख रुपये किमतीची ऑटो रिक्षा (क्र. केए 22 डी 4120) असा एकूण 1 लाख 48 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.


