बेळगाव लाईव्ह : बेळगाव पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पदभार स्वीकारल्यापासून अंमली पदार्थ आणि काळा धंदा विरोधातील धाडीचे सत्र सुरू आहे.
सोमवारी 22 रोजी बेळगाव शहरातील केंद्रीय बसस्थानकाजवळील जुन्या भाजी मार्केट येथे सार्वजनिक ठिकाणी दोन आरोपी बेकायदेशीरपणे ड्रग्ज विक्री करत असल्याची माहिती मिळताच एस.डी. सत्यनाईक, एसीपी बाजार यांच्या मार्गदर्शनाखाली, शमहांतेश दामनवर, पीआय मार्केट पोलीस ठाणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धाड टाकून दोन संशयित आरोपीना अटक करत त्यांच्याजवळील गांजा जप्त केला
पोलिसांनी 1) युनूस दस्तगीरसाब सनदी, रा. न्यू गांधी नगर, बेळगाव, आणि 2) मुशैब जारारहुद पटेल, रा. वीरभद्र नगर, बेळगाव यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान, आरोपींनी स्वतःच्या फायद्यासाठी ड्रग्ज विक्री करत असल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून 48.22 ग्रॅम हेरॉईन (किंमत 40,000 रुपये) आणि गुन्ह्यासाठी वापरलेली एक मोटरसायकल (किंमत 40,000 रुपये) जप्त करण्यात आली. या प्रकरणी बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 113/2025, कलम 21(b) एनडीपीएस कायद्यांतर्गत नोंदवून कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, तपास सुरू आहे. पोलिसांनी तरुणांना अशा कृत्यांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जुगार खेळणाऱ्यांवर एपीएमसी पोलिसांचा छापा: चार जुगाऱ्यांना अटक
सोमवारी रात्री एपीएमसी मार्केट यार्डजवळील सार्वजनिक ठिकाणी काही जण जुगार (अंदार-बहार) खेळत असल्याची माहिती मिळताच संतोष दळवी, पीएसआय एपीएमसी ठाणे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी धाड टाकत 1) महांतेश हणमंतप्पा लमाणी, रा. महांतेश नगर, बेळगाव, 2) परुशराम बाबू करिकट्टी, रा. कंग्राळी बीके, 3) दीपक सोनप्पा सगट, रा. भारत नगर, बॉक्साईट रोड, आणि 4) बाळेश यल्लप्पा नायक, रा. कलखांब बेळगाव यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून 4,300 रुपये रोख आणि पत्ते जप्त करण्यात आले. या प्रकरणी एपीएमसी ठाण्यात गुन्हा क्रमांक 74/2025, कलम 87 केपी कायद्यांतर्गत नोंदवून कायदेशीर कारवाई करण्यात आली असून,
दोन्ही प्रकरणांमध्ये एकूण 84,300 रुपये किंमतीच्या वस्तू जप्त
या दोन्ही प्रकरणांमध्ये 48.22 ग्रॅम हेरॉईन (किंमत 40,000 रुपये), एक यामाहा मोटरसायकल (किंमत 40,000 रुपये), 4,300 रुपये रोख आणि ताशांचे पत्ते अशा एकूण 84,300 रुपये किंमतीच्या वस्तू जप्त करण्यात आल्या. या कारवाईत सहभागी असलेले संबंधित ठाण्यांचे पीआय, पीएसआय आणि कर्मचाऱ्यांचे बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त आणि डीसीपी यांनी कौतुक केले आहे.
बेळगाव शहर पोलिसांची बेकायदेशीर कृत्यांवर कडक नजर
बेळगाव शहरात अशा बेकायदेशीर कृत्यांवर कडक नजर ठेवण्यात येत असून, तरुण पिढीला दुष्टचक्रात अडकण्यापासून वाचवण्यासाठी पोलीस विभाग झटपट कारवाया करत आहे. या कारवाया सातत्याने सुरू असून, शहरातील बेकायदेशीर कृत्ये मुळासकट उखडून टाकण्यासाठी बेळगाव शहर पोलिसांचे अथक प्रयत्न सुरू आहेत.


