belgaum

या’ सर्कल मधील सिग्नल दुरुस्त करून सुरू करण्याची मागणी

0
38
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील श्री कनकदास सर्कल येथील सिग्नलची दयनीय अवस्था झाली असून रस्ते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सदर बंदावस्थेतील सिग्नल दुरुस्त करून तात्काळ सुरू करण्यात यावा, अशी मागणी जागरूक नागरिकांकडून केली जात आहे.

बेळगावच्या कणबर्गी प्रदेशातून शहराला जोडणाऱ्या प्रमुख मार्गाच्या ठिकाणी श्री कनकदास सर्कल आहे. या ठिकाणी पूर्वी सिग्नलची व्यवस्था असल्यामुळे वाहतूक सुरळीत होत होती. मात्र अलीकडच्या काळात देखभाली अभावी सदर सिग्नल बंद पडला असून सध्या मोडकळीला आलेल्या अवस्थेत धूळ खात पडून आहे.

पुना -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या पुलाखाली शहराला जोडणाऱ्या या प्रमुख मार्गावर दररोज हजारो वाहनांची ये -जा सुरू असते. या परिस्थितीत येथील सिग्नल बंद असण्याबरोबरच रहदारी पोलिसांची देखील क्वचितच हजेरी लागत असल्यामुळे श्री कनकदास सर्कल येथे वाहने मनमानी हाकली जातात.

 belgaum

त्यामुळे दिवसातून बऱ्याचदा वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होण्याबरोबरच अपघाताचे प्रसंग देखील उद्भवत असतात.

तरी एखादी गंभीर दुर्घटना घडण्यापूर्वी रहदारी पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन श्री कनकदास सर्कल येथील सिग्नल युद्धपातळीवर दुरुस्त करून पूर्ववत सुरू करावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.