भ्रष्टाचारासंदर्भात बेळगाव वन केंद्राला आमदारांची भेट; व्यवस्थापकाची झाडाझडती

0
10
 belgaum

बेळगाव लाईव्ह :मालमत्ताधारकांच्या ई-आस्थी अंतर्गत केल्या जाणाऱ्या ए व बी खाते वितरणामध्ये भ्रष्टाचार व एजंटराज वाढल्याच्या तक्रारींची दखल घेत बेळगाव उत्तरचे आमदार असिफ (राजू) सेठ यांनी आज सकाळी अशोकनगर येथील बेळगाव वन केंद्राला भेट देऊन तेथील अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. तसेच नागरिकांनी कर भरण्यासाठी ज्यादा पैसे न देता अथवा एजंटांच्या आहारी न जाता फक्त अर्जाचे 25 रुपये भरून आपला कर अदा करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

महापालिकेतर्फे ई-आस्थी अंतर्गत मालमत्ताधारकांच्या मिळकतींची नोंद करून घेऊन संबंधितांना ए व बी खात्यांचे वितरण केले जात आहे. मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढण्यासह एजंटराज फोफावले असल्याच्या नागरिकांच्या वाढत्या तक्रारी आहेत.

याची दखल घेत आज शनिवारी सकाळी अशोकनगर येथील इंदिरा कॅन्टीन मधील कार्यक्रम आटोपल्यानंतर बेळगाव उत्तरचे आमदार असिफ (राजू) सेठ यांनी तेथील बेळगाव वन केंद्राला भेट दिली. यावेळी तेथील कामकाजाची पाहणी करण्याबरोबरच ए व बी खात्यासंदर्भातील उपस्थित नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. तसेच तेथे सुरू असलेला भ्रष्टाचार आणि एजंटांच्या सुळसुळाटाबद्दल त्या केंद्राच्या व्यवस्थापकाला जाब विचारून आमदार सेठ यांनी त्याला धारेवर धरले.

 belgaum

त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी कर, घरपट्टी भरण्यासाठी नागरिकांनी अनावश्यक जादा पैसे देण्याची गरज नाही. त्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सक्त ताकीद देण्यात आली असून एजंटगिरीला आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत असे सांगून एजंटांच्या नादी न लागता नागरिकांनी त्यासाठी आवश्यक अर्जाचे फक्त 25 रुपये द्यावेत, असे आवाहन आमदार असिफ सेठ यांनी केले.

याप्रसंगी त्यांच्या समवेत महापालिका आयुक्त शुभा बी., वरिष्ठ अधिकारी रेश्मा तालिकोटी, नगरसेवक मुजम्मिल डोणी, नगरसेवक रवी साळुंखे आदींसह संबंधित अधिकारीवर्ग उपस्थित होता.

यावेळी बोलताना महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी उपस्थित नागरिकांना कर भरणा प्रक्रियेची थोडक्यात माहिती देऊन कर भरून घेणाऱ्या एखाद्या अधिकाऱ्याचा एजंट लोकांशी संबंध असल्याचे आढळून आल्यास त्या अधिकाऱ्याला जागेवर तात्काळ निलंबित केले जाईल, असा सक्त इशारा दिला.

आमदारांच्या भेटीनंतर बेळगाव लाईव्हशी बोलताना नगरसेवक मुजम्मिल डोणी यांनी सांगितले की, ए बी आणि आता सिद्धरामय्या सरकारने सुरू केलेल्या सी खात्यासाठी अव्वाच्या सव्वा पैशाची मागणी केली जात असल्याच्या वाढत्या तक्रारी आहेत माजी नागरिकांना एकच विनंती आहे की ए बी अथवा सी खाते असू दे तो तुमचा अधिकार असून त्यासाठी तुम्हाला कोणालाही साधा एक रुपया देण्याचीही गरज नाही. आमच्याकडे आलेल्या तक्रारीनुसार अधिकाऱ्यांकडून प्रथम काम होणार नसल्याचे सांगितले जाते मात्र त्यानंतर तेच काम एजंटामार्फत करून दिले जाते.

त्यासाठी 5 ते 20 हजार रुपयांपर्यंत पैसे उकळले जातात. तेंव्हा माझी समस्त जनतेला विशेष करून अमननगर गांधीनगर मारुती नगर वगैरे भागातील नागरिकांना विनंती आहे की, या ठिकाणी तुमचा जो कर भरून घेतला जातो त्यासाठी अर्जाचे 25 रुपये वगळता सर्व प्रक्रिया मोफत असते. हे लक्षात घेऊन जादाचे पैसे देऊ नका. अधिकारी अथवा एजंटना आपण जे जादाचे पैसे देत आहोत ते आपल्या श्रमाचे आहेत हे प्रत्येकाने ध्यानात घ्यावे.

खास करून बेळगाव वन केंद्रामध्ये ऑटो चालक, मजूर वगैरे गरीब तसेच सर्वसामान्य लोकांना लुबाडण्याचा प्रकार सुरू आहे अशी माहिती देऊन जर असा प्रकार एखाद्याच्या बाबतीत घडत असेल तर संबंधितांनी तात्काळ थेट आमदारांशी किंवा आमच्याशी संपर्क साधावा. आम्ही त्या अधिकारी किंवा एजंटावर तात्काळ कारवाई करू असे नगरसेवक डोणी यांनी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी उपस्थित नागरिकांना कर भरणा प्रक्रियेची थोडक्यात माहिती देऊन कर भरून घेणाऱ्या एखाद्या अधिकाऱ्याचा एजंट लोकांशी संबंध असल्याचे आढळून आल्यास त्या अधिकाऱ्याला जागेवर तात्काळ निलंबित केले जाईल, असा सक्त इशारा दिला.

आमदारांच्या भेटीनंतर बेळगाव लाईव्हशी बोलताना नगरसेवक मुजम्मिल डोणी यांनी सांगितले की, ए बी आणि आता सिद्धरामय्या सरकारने सुरू केलेल्या सी खात्यासाठी अव्वाच्या सव्वा पैशाची मागणी केली जात असल्याच्या वाढत्या तक्रारी आहेत माजी नागरिकांना एकच विनंती आहे की ए बी अथवा सी खाते असू दे तो तुमचा अधिकार असून त्यासाठी तुम्हाला कोणालाही साधा एक रुपया देण्याचीही गरज नाही. आमच्याकडे आलेल्या तक्रारीनुसार अधिकाऱ्यांकडून प्रथम काम होणार नसल्याचे सांगितले जाते मात्र त्यानंतर तेच काम एजंटामार्फत करून दिले जाते. त्यासाठी 5 ते 20 हजार रुपयांपर्यंत पैसे उकळले जातात. तेंव्हा माझी समस्त जनतेला विशेष करून अमननगर गांधीनगर मारुती नगर वगैरे भागातील नागरिकांना विनंती आहे की, या ठिकाणी तुमचा जो कर भरून घेतला जातो त्यासाठी अर्जाचे 25 रुपये वगळता सर्व प्रक्रिया मोफत असते. हे लक्षात घेऊन जादाचे पैसे देऊ नका. अधिकारी अथवा एजंटना आपण जे जादाचे पैसे देत आहोत ते आपल्या श्रमाचे आहेत हे प्रत्येकाने ध्यानात घ्यावे. खास करून बेळगाव वन केंद्रामध्ये ऑटो चालक, मजूर वगैरे गरीब तसेच सर्वसामान्य लोकांना लुबाडण्याचा प्रकार सुरू आहे अशी माहिती देऊन जर असा प्रकार एखाद्याच्या बाबतीत घडत असेल तर संबंधितांनी तात्काळ थेट आमदारांशी किंवा आमच्याशी संपर्क साधावा. आम्ही त्या अधिकारी किंवा एजंटावर तात्काळ कारवाई करू असे नगरसेवक डोणी यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.