संरक्षण दलासाठी बेळगावहून सारस ड्रोनचा प्रेरणादायी उदय

0
3
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगावमध्ये घरातील शयनगृहात स्वप्नवत असलेल्या सारस ड्रोनचा प्रेरणादायी उदय आता संपूर्ण भारतभरातील संरक्षण कार्यांना बळ देत आहे. सारस एरोस्पेसचे संस्थापक राहुल पाटील, ज्यांची उड्डाणाची आवड व्हीटीयू कॅम्पसमध्ये बेळगावच्या हृदयातून भारतातील सर्वात अत्याधुनिक कंपन्यांपैकी एक बनवण्याकडे होती.

त्या अनुषंगाने वाटचाल करताना त्यांनी भारतीय सैन्य, नौदल, बीएसएफ आणि डीआरडीओ यांच्यासाठी युद्धभूमीवर डिलिव्हरी प्रणालीने सज्ज अशा 350 हून अधिक कि.मी. रेंजच्या उभ्या टेकऑफ असलेल्या ‘सारस’ या स्वदेशी ड्रोनची निर्मिती केली आहे.

एका सामान्य लष्करी कुटुंबात जन्मलेल्या राहुल पाटील यांचे शिक्षण मराठी विद्यानिकेतन आणि जैन पीयू कॉलेजमध्ये झाले आहे. वैमानिक बनण्याचे स्वप्न असल्यामुळे पुढे त्यांनी वैमानिक अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण केला. प्रारंभी आपल्या पगारातून ड्रोनची निर्मिती करणाऱ्या राहुल यांनी कालांतराने पूर्णवेळ काम करत बूटस्ट्रॅप सारस ड्रोन तयार केला.

 belgaum

आपल्या शयनकक्षात ड्रोन निर्मितीचे स्वप्न पाहून तो बनविण्यास सुरुवात करणाऱ्या राहुल यांनी आतापर्यंत 200 हून अधिक ड्रोन बनवले असून एका वर्षात 100 हून अधिक जणांना ड्रोन हाताळण्याचे (ड्रोन पायलटिंग) प्रशिक्षण दिले आहे. व्हीटीयू मधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी 90 हून अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

हे करताना त्यांनी डिलिव्हरी टॉवर्स, थ्रस्ट बेंच आणि अग्निशमन ग्राउंड रोव्हर्स बांधले. हिमालयात ड्रोनद्वारे जीवनरक्षक पुरवठ्याचे वितरण केले. आता राहुल पाटील लवकरच डीजीसीए प्रमाणित ड्रोन पायलट प्रशिक्षण केंद्र सुरू करणार आहेत. सारस हे फक्त एका स्टार्टअपपेक्षा जास्त असून ते बेळगावसारखे शहर उत्कटतेने, शिकवणीने आणि निखळ उत्साहाने काय निर्माण करू शकते याचा पुरावा आहे.

news courtasy: all about belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.