बेळगाव लाईव्ह :अल्पवयीन मुलीवर झालेल्या कथित सामूहिक बलात्काराप्रकरणी बेळगाव पोलिसांनी बाल न्याय कायदा आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोक्सो) कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत तीन अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून एक जण फरारी आहे.
अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्काराची घटना गेल्या 6 मे रोजी सावगावजवळ एका फॉर्म हाऊस वर घडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या ओळखीच्या तिन्ही मुलांनी वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने तिला शेतात नेल्याचा आरोप आहे.
त्यापैकी दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले असून तिसरा सध्या फरार आहे. बेळगाव पोलिस आयुक्तांकडे मुलीच्या पालकांनी 12 मे रोजी तक्रार केली होती. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येऊन तपास कार्य हाती घेण्यात आले होते. याप्रकरणी अधिक चौकशी सुरू असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.