बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये एका मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात परजिल्ह्यातील एका सीपीआयच्या मुलासह रिसॉर्ट चालवणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. या अटकेमुळे आरोपींची एकूण संख्या 5 झाली आहे.
टिळकवाडी पोलिस ठाण्यातील एका मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात पोलिसांनी अखेर परजिल्ह्यातील पोलीस निरीक्षकाच्या (सीपीआय) मुलासह तिघाजणांना अटक केली आहे.
अटक केलेल्यांमध्ये राज्यातील अन्य जिल्ह्यात कर्तव्यावर असलेल्या सीपीआयचा मुलगा आणि रिसॉर्ट चालवणाऱ्या एका अल्पवयीनासह दोघा जणांचा समावेश आहे. बेळगाव शहराबाहेरील रिसॉर्टमध्ये सामूहिक बलात्कार करणाऱ्या साकिबसह दोघा अल्पवयीन मुलांनी एका मुलीवर बलात्कार केला होता.
याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी साकिबसह एका अल्पवयीन मुलाला अटक केली. त्यानंतर सीपीआयच्या मुलासह रिसॉर्ट चालवणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलांना रिसॉर्ट भाड्याने देणाऱ्या रोहन पाटील व आशतोष पाटील यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे.
या दोघांनी घर भाड्याने घेऊन दरमहा 20 हजार रुपये देऊन त्याचे रिसॉर्टमध्ये रूपांतरित केले. दोघांना अटक झाल्यामुळे सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींची संख्या 5 झाली आहे. बेळगाव मार्केट पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी आरोपींना अटक केली असून सीपीआयच्या मुलाला रिमांड होममध्ये ठेवण्यात आले आहे.


