बेळगाव लाईव्ह :कंग्राळी खुर्द येथे कलाश्री उद्योग समुहाच्यावतीने आयोजित चौथ्या योजनेतील सतराव्या ड्रॉच्या भाग्यवान विजेत्या देवघनहट्टी गावच्या मनाली पी. पाटील या ठरल्या आहेत. त्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते अर्धा तोळे सोने देऊन गौरवण्यात आले.
कलाश्री सभागृहात प्रकाश डोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून भाग्योदया महिला को -ऑपरेटिव्ह सोसायटी कंग्राळीच्या चेअरमन शीतल बर्डे, वनदेवी मल्टिपरपज को-ऑपरेटिव्ह सोसायटी जांबोटीचे चेअरमन लक्ष्मण खेमजी कासर्लेकर, माऊली विद्यालय कणकुंबीचे मुख्याध्यापक सुनील गणपतराव चिघूळकर, वनदेवी को-ऑपरेटिव्ह सोसायटी जांबोटीचे संचालक पुंडलिक लक्ष्मणराव पाटील आणि विठ्ठल राजगोळकर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवराच्या हस्ते दिप प्रज्वलन झाल्यानंतर त्यांना कलाश्री ग्रुपच्यावतीने प्रकाश डोळेकर व सुकन्या डोळेकर यांचे हस्ते भेटवस्तू व बुके देऊन गौरविण्यात आले.
मान्यवरांनी मनोगते व्यक्त करताना कलाश्री उद्योग समुह व सोसायटी यांची ग्राहकांमधील विश्वासार्हता वाढली आहे. कलाश्रीने अल्पावधीत कौतुकास्पद प्रगती केली असल्याचे सांगून शुभेच्छा दिल्या. त्यानंतर प्रमुख अतिथींच्या हस्ते चिठ्ठ्या काढून भाग्यवान विजेत्यांची नांवं घोषित करण्यात आली.
अर्धा तोळे सोने या बंपर बक्षीसाच्या मानकरी मनाली पाटील या तर उपविजेते बक्षीस मिक्सर ग्राईडरच्या मानकरी रोहिणी नाकाडी (बैलूर), उदय कुमार इदगल (बागेवाडी), यमुना उमेश रेमांचे (धामणे बेळगांव) व नारायण यल्लाप्पा मुतगेकर (हंगरगा) हे ठरले. तसेच दुपारी 4 ते 4.30 या वेळेत उपस्थित असलेल्या सुमन गोवेकर (बैल्लूर ), सातेरी सावंत (देसूर), सुनील आजरेकर (विनायक नगर) आणि सिद्दाप्पा एस. तुक्कानाचे (देवगणहट्टी ) या भाग्यवान ग्राहकांनाही मान्यवरांचे हस्ते भेट वस्तू देऊन गौरवण्यात आले.
विजेत्यांचे कलाश्री उद्योग समुहावतीने अभिनंदन करण्यात आले. यावेळी कलाश्री सोसायटी ठेव योजनेतील मागील ड्रॉच्या भाग्यवान विजेत्याना 43 इंच कलर टी व्ही , रोख रक्कम व कॉर्नर सोफासेट देखील देण्यात आले. तसेच हितचिंतकांच्या दहावी परीक्षेत गुणवत्तेत उत्तीर्ण झालेल्या उत्कर्षा उत्तम पाटील, समर्थ कृष्णा पाटील व श्रावणी विष्णू डोळेकर या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मनाली कुगजी यांनी अपंग रामचंद्र कुगजी याना पती म्हणून स्वीकारून यशस्वी संसार करून एक आदर्श समाजासमोर ठेवला असलेने या दांपत्याचाही सन्मान करण्यात आला.
यावेळी वधूवर सूचक मेळावाही मोठया उत्साहात पार पडला. कार्यक्रमास सोसायटीचे संचालक, ग्राहक, वितरक, सभासद आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे औचित्य साधून 30 रुपये किलो प्रमाणे आलेल्या ग्राहकांना साखर वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टी. डी. पाटील यांनी केले, तर आभार वाय. बी. पवार यांनी मानले .


