बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुक्यातील संती संतबस्तवाड येथे धर्मग्रंथ विटंबना आणि चोरी प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे सीपीआय मंजुनाथ हिरेमठ यांना निलंबित करण्यात आले आहे.
कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आहेत. बेळगाव पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांनी निलंबनाचा आदेश बजावला आहे.
गेल्या महिन्याभरापासून संती बस्तवाड गावात सुरू असलेल्या प्रकरणे हाताळण्यात पोलीस निरीक्षकांना अपयश आले आहे महत्त्वाचे म्हणजे धर्मग्रंथ विटंबना प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

गेल्या चार दिवसांपूर्वी मुस्लिम समुदायाने कीत्तूर चन्नम्मा चौकात आंदोलन करत प्रकरणी आरोपींवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली होती त्याचवेळी स्थानिक पोलिसांना निलंबित करा अशी देखील मागणी करण्यात आली होती याची दखल घेत पोलीस आयुक्तांनी पोलीस निरीक्षकाच्या निलंबनाचा आदेश बजावला आहे.
चन्नम्मा चौकातील आंदोलनात पोलीस आयुक्तांनी तीन दिवसात आरोपींना गजाआड करण्याचे आश्वासन दिले होते मात्र प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी पोलिसांना आणखी अवधी हवा असल्याचे काल पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ट केले होते त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी 3 वाजता कित्तूर चन्नम्मा चौकात मोठ्या संख्येने उपस्थित राहून मुस्लिम बांधव निदर्शने करणार आहेत.