बेळगाव लाईव्ह : मुख्यमंत्री उद्या एक दिवसाच्या बेळगाव दौऱ्यावर येणार असून, विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्री उद्या सकाळी ११ वाजता बेळगाव शहरातील कला मंदिराच्या उद्घाटनासाठी येणार आहेत.
या ठिकाणी एक भव्य सोहळा आयोजित करण्यात आला असून, विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उदघाटनाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
यानंतर दुपारी १ वाजता मुख्यमंत्री सुवर्ण विधानसौध येथे अधिकृत बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण विकासकामांचा आढावा घेतला जाणार आहे.
संध्याकाळी ४ वाजता मुख्यमंत्री चिकोडी येथे आयोजित कार्यक्रमात भाग घेतील. स्थानिक लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि अधिकारी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यानंतर संध्याकाळी ५ वाजता मुख्यमंत्री बेळगावहून बंगळूरच्या दिशेने रवाना होतील, अशी अधिकृत माहिती उपलब्ध झाली आहे.
कला मंदिर येथील भव्य व्यापारी संकुलाच्या उद्घाटन कार्यक्रमाची तयारी जोरदार करण्यात आली असून स्मार्ट सिटी च्या वतीने हा उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी कला मंदिर समोरील मुख्य रस्त्यावर भव्य प्रमाणात शामियाना उभे करण्यात आला आहे.