बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील टिळकवाडी येथील एका अपार्टमेंटमधील नागरिकाने रेन हार्वेस्टिंगचा अनोखा उपक्रम राबवत पाण्याची साठवणूक केली आणि पाणीटंचाईवर मात केली. गेल्या वर्षीपासून हरीश सदानंद तेरगावकर यांच्या नेतृत्वाखाली या पद्धतीच्या उपक्रमाला या नागरिकांनी सुरुवात केली.
पावसाचे वाहून जाणारे पाणी त्याचे नियोजन करून छाटणी गाळणी करून विहिरीत पाणी साठवून ते नैसर्गिक रित्या शुद्ध केले आणि वापरण्यायोग्य बनवले त्यामुळे दरवर्षी एप्रिल मे च्या दरम्यान टँकरद्वारे या भागाला पाणीपुरवठा करावा लागत होता त्याला फाटा मिळत या रेन हार्वेस्टिंग च्या माध्यमातून साठवलेल्या विहिरीच्या पाण्यातूनच या नागरिकांच्या गरजा भागत आहेत त्यामुळे पैशाची तर बचत झाली पण त्याचबरोबर नैसर्गिक पाण्याची ही बचत झाली. त्यामुळे एकीकडे नागरिकांना समाधान तर लाभत आहेत पण त्याचबरोबर एक सामाजिक उपक्रमाचा आदर्श घालून देण्याचे समाधान देखील मिळत आहे.
या उपक्रमात छतावरील पाण्याचे संकलन त्याचे गाळप जमिनीत पुनर्भरण आणि नवीन युवकांना रेन हार्वेस्टिंग पाणी आडवा पाणी जिरवा बद्दलचे मार्गदर्शन या चतुर सूत्राच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला.
या संदर्भात बोलताना हरीश तेरगावकर म्हणाले की ” पावसाच्या पाण्याच्या साठवणुक हा आता पर्याय नसून गरज बनली आहे विशेषता संकुलात अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या शेकडो नागरिक एकाच विहिरीवर अवलंबून असतात त्या ठिकाणी प्रत्येक थेंब महत्त्वाचा असतो. आपण जर त्याचे योग्य नियोजन केले नाही तर लवकरच टँकरवर होणारा खर्च वीज बिलापेक्षा जास्त होईल. निसर्ग आपल्याला विनामूल्य पाऊस देतो फक्त ते पाणी साठवणे गरजेचे आहे.
त्यांचा आदर्श घेत जवळच असणाऱ्या सराफ कॉलनीतील कुटुंबानेही आपल्या घरामध्ये रेन हार्वेस्टिंग ची योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. तेरगावकर बेळगावात या पद्धतीने रेन हार्वेस्टिंग चा क्रम मोठ्या प्रमाणात बेळगावत राबवण्याचा विचार करत आहेत. योग्य ज्ञान आणि सामूहिक प्रयत्नाने शहरी समुदाय त्यांच्या पाण्याच्या भवितव्यावर नियंत्रण मिळवू शकतात त्यामुळे आपल्या छतापासून सुरुवात करूया.
बेळगाव शहरात याव्यतिरिक काही ठिकाणी
हा उपक्रम पूर्वीच राबवला गेला आहे त्याचे चांगले परिणाम देखील दिसत आहेत. गोगटे कॉलेज समोरील तिन्हीरी हॉटेलमध्ये या पद्धतीचा एक पाणी आडवा पाणी जिरवा उपक्रम राबवण्यात आला आहे हे देखील त्याचे उत्तम उदाहरण आहे. अभ्यासकानी एकदा त्याची पाहणी करणे गरजेचे आहे.