Wednesday, April 23, 2025

/

मुचंडीत रंगला खिल्लारी गायीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम

 belgaum

बेळगाव लाईव्ह : खण-नारळाने ओटी भरत केलेले औक्षण…पेढे- जिलेबी-गोडाधोडाचा नैवेद्य …भक्तिगीतांनी आध्यात्मिक बनलेला परिसर…अशा वातावरणात गो-मातेचे डोहाळे जेवण करुन मुचंडी येथील शिरोळे कुटुंबाने गायीप्रति श्रद्धा अन् स्नेहाचा आदर्श घालून दिलाय.

मुचंडी येथील शिरोळे कुटुंबीयांनी आपल्या ‘कल्याणी’ गायीच्या डोहाळे जेवणाचा एक अत्यंत भावनिक आणि आनंददायक कार्यक्रम आयोजित केला. या सोहळ्यात पारंपरिक पद्धतीने गायीला साडी-चोळी नेसवून, ओटी भरली आणि विविध गोडधोड पदार्थ अर्पण केले. या कार्यक्रमात शिरोळे कुटुंबीयांबरोबर ग्रामस्थांनीही उत्साहाने सहभाग घेतला.

मुचंडी गावातील शिरोले कुटुंबीयांनी आपल्या लाडक्या गायीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम अत्यंत जल्लोषात आणि प्रेमाने साजरा केला. ‘कल्याणी’ या शिरोले कुटुंबाच्या खास खिल्लार गायला साडी-चोळी घालून, गोडधोड पदार्थ अर्पण करून, पारंपरिक पद्धतीने डोहाळे जेवण साजरे करण्यात आले.Dohale jevan

यामध्ये गावातील नागरिकांसोबत कुटुंबीयांनीही सहभाग घेतला. या कार्यक्रमामुळे प्राणिमात्रांवरील प्रेम आणि गोवंश संवर्धनाची महत्त्वाची शिकवण दिली आहे. ‘कल्याणी’ या खिल्लार गायीच्या डोहाळे जेवणाचे आयोजन अत्यंत खास आणि संस्मरणीय ठरले. यावेळी गोडधोड पदार्थ, फळं, आणि विविध गोधान्य अर्पण करून गायीला नैवेद्य अर्पण करण्यात आले.

अतुल  शिरोळे हे एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील पैलवान आहेत, त्यांच्या कुटुंबाने आपल्या परंपरांना जपत, गोवंश संवर्धनाचा आदर्श घालून दिला आहे. शिरोले कुटुंब शर्यतीचे बैल आणि गायीच्या संगोपनात एक अग्रणी स्थानावर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.