बेळगाव लाईव्ह :खडेबाजार येथे शितल हॉटेल जवळ दुकानासमोर ऑटोरिक्षा पार्क केल्याच्या कारणावरून दुकानदार भावंडांवर तलवारीने हल्ला करून फरारी झालेल्या दोघ आरोपींना पोलिसांनी गजाआड केले आहे.
दुकानासमोर ऑटो रिक्षा पार्क केल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादावादीचे पर्यवसान दोघाजणांनी दोघा भावांवर प्राणघातक शस्त्राने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना गेल्या गुरुवारी खडेबाजार येथील शितल हॉटेल नजीक घडली होती.
त्यानंतर फरारी झालेले आरोपी अमजद देसाई (वय 50) आणि सिराज देसाई या दोघांना पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. आरोपींपैकी जखमी झालेल्या एकावर बीम्स हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार करून दोघांनाही न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
आरोपींनी तलवारीने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या भावंडांची नावे उमेर मनियार आणि उयोर मनियार अशी आहेत. याप्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.