बेळगाव लाईव्ह : बेळगावातील गणेशपुर परिसरात पाच वर्षीय बालिकेवर भटक्या कुत्र्यांनी भीषण हल्ला केला आहे.
बेळगावातील गणेशपुर येथे प्राविण्या बोयर या पाच वर्षीय बालिकेवर तीन भटक्या कुत्र्यांनी भीषण हल्ला केला. या हल्ल्यात बालिकेच्या पोट, पाठ आणि पायाला गंभीर जखमा झाल्या असून, तिला तातडीने बिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सध्या तिच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, याच भागात काल एका मुलावरही कुत्र्यांनी हल्ला केला होता. सातत्याने होत असलेल्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
स्थानिक प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप असून, त्यांनी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने त्वरित उपाययोजना न केल्यास मोठा आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.