बेळगाव लाईव्ह: राज्यातील १९७ पोलीस अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचे पदक जाहीर झाले आहे. यामध्ये मार्केटचे पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर, महिला पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक अश्विनी पाटील यांच्यासह बेळगाव येथील काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
यापूर्वी बेळगावात सेवा बजावलेले व सध्या विजापूरचे अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख म्हणून कार्यरत असलेले रामनगौडा हट्टी, डीसीआरईचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी, घटप्रभेचे पोलीस निरीक्षक हसनसाब मुल्ला, राखीव दलाचे पोलीस निरीक्षक कन्याप्पा अर्जुन गंजी आदींना मुख्यमंत्र्यांचे पदक जाहीर झाले आहे.
याबरोबरच जिल्हा सशस्त्र दलातील साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पायनगौडा बाहुबली पाटील, जिल्हा विशेष विभागातील हवालदार बी. एस. पाटील, सीसीआरबी विभागाचे हवालदार डब्ल्यू एफ. मुजावर, अथणी पोलीस स्थानकातील जमीरहुसेन डांगेआदींचाही या यादीत समावेश आहे.
महांतेश धामण्णावर यांनी गेल्या दोन वर्षात मार्केट पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात उत्तम कामगिरी बजावली आहे. तर अश्विनी पाटील या सीआयडी वनविभागात कार्यरत असताना वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी रोखण्यासाठी मोठी कामगिरी बजावली आहे.1