बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या कुमारस्वामी ले-आउट परिसरात अचानक आग लागल्याची घटना घडली आहे.
आगीचा भडका उडताच स्थानिकांमध्ये घबराट निर्माण झाली. मात्र, अग्निशामक दलाने वेळीच घटनास्थळी पोहोचून आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला.
बेळगाव शहरातील कुमारस्वामी ले-आउट परिसरात आज सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागली. परिसरात घरं असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आग आटोक्यात आणली.
या कामगिरीत अग्निशामक अधिकारी वाय. जी. कोलकार, एम. एम. जाकोटी, अशोक पाटील, प्रकाश पाटील आणि बन्सु बुड्डण्णावर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या वेळीच केलेल्या कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.