बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या कित्तूर राणी चन्नम्मा संग्रहालयातील आणखी एका सिंहाचा आज मृत्यू झाला. वृद्धापकाळ आणि अवयवांच्या अकार्यक्षमतेमुळे मादी सिंह निरुपमा याचा मृत्यू झाला.
गुरुवारी दुपारी १२:५५ वाजता त्याच्या विश्रांती कक्षात ‘निरुपमा’चा मृत्य झाला असून पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सिंह निरुपमाच्या मृतदेहाची योग्य तऱ्हेने विल्हेवाट लावण्यात आली.
या प्रक्रियेदरम्यान संग्रहालयाचे कार्यकारी संचालक मारिया ख्रिस्तू राजा, रेंज वनाधिकारी पवन कुरनिंग, बहुविशिष्ट पशुवैद्यकीय रुग्णालय बेळगावचे वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. हणमंत सण्णकी,
प्रादेशिक संशोधन अधिकारी डॉ. श्रीकांत कोहळ्ळी, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नागेश हुइलगोळ तसेच कित्तूर राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयातील कर्मचारी उपस्थित होते.