बेळगाव लाईव्ह : चंदगड तालुक्यातून गोव्याला जोडणारा तिलारी मार्ग आगामी 25 दिवस रस्ता दुरुस्तीमुळे बंद राहणार आहे.चंदगड तिलारी घाटातील खचलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सोमवारी सुरु करण्यात आले असून घाटातून ये-जा करणारी सर्व वाहने बंद करण्यात आली आहेत.गोव्यात जाण्यासाठी तिलारी घाट हा महत्त्वाचा हा मार्ग आहे.
या घाटात अनेक ठिकाणी रस्त्याची पडझड झाली असून त्याच्या दुरुस्तीचे काम सोमवारी सुरू करण्यात आले. त्यामुळे पुढील २० ते २५ दिवस घाटातील वाहतूक बंद राहणार आहे.
बेळगाव जिल्ह्यातून दररोज शेकडो वाहने तिलारी मार्गे गोव्याला ये जा करत असतात. बेळगाव भागातून गोव्याला इजा करण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून तिलारी घरी मार्गाचा वापर होत असतो. रस्ते दुरुस्तीमुळे आगामी काही दिवस आता हा मार्ग बंद असणार आहे त्यामुळे बेळगाव मधून गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांना चोरला, आंबोली किंवा अनमोड मार्गाचाच अवलंब करावा लागणार आहे.
तिलारी रस्त्यावर काम सुरु असताना जिवित व वित्तहानी होणार नाही यासाठी तिलारी घाटातील वाहतूक नियंत्रित करावी म्हणून चंदगड व दोडामार्ग पोलिसांना कळविले असून वाहनधारकांनी सहकार्य करावे, असे आवाहन
चंदगड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंता इफ्तिकार मुल्ला यांनी केले आहे.
गॅबियन भिंत उभारली जाणार रस्ता कोसळलेल्या ठिकाणी साधारणपणे सात मीटर उंचीची तेरा मीटर लांबीची गॅबियन भिंत उभारण्यात येणार आहे. काँक्रिट, खडक, वाळू आणि मातीने भरलेला गॅबियन पिंजरा असतो. भविष्यात पुन्हा रस्ता कोसळू नये म्हणून गॅबियन भिंत बांधली जाणार आहे. यासाठी कमीत कमी २० ते २५ दिवस लागणार आहेत.