Saturday, December 6, 2025

/

टॅक्स चलानसाठी शहापूर येथील दुकानदारांचे डीसींना निवेदन

 belgaum

शहापूर खडेबाजार येथील रस्ता रुंदीकरणावेळी नाथ पै सर्कल रोड येथे विस्थापित करण्यात आलेल्या आम्हा दुकानदारांना महापालिकेच्या महसूल विभागाकडून टॅक्स चलान अर्थात कर पावती देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी नाथ पै सर्कल रोड येथील दुकानदाराने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

सतत दुकानदारांनी आज गुरुवारी सकाळी उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना (डीसी) सादर केले. सर्वसमावेशक विकास आराखड्या (सीडीपी) अंतर्गत 1996 मध्ये खडे बाजार शहापूर येथील रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. त्यावेळी रस्ता रुंदीकरणात जागा गेलेल्या दुकानदारांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांना नाथ पै सर्कल रोड या रस्त्याशेजारी जागा देण्यात आल्या. त्यानंतर संबंधित दुकानदारांनी त्यांना दिलेल्या जागेत महापालिकेची मंजुरी व निर्देशानुसार स्वखर्चाने सिमेंट काँक्रीटची पक्की दुकाने बांधली. त्यानंतर त्यांनी आपल्या दुकानात संदर्भातील कर देखील भरण्यास सुरुवात केली होती. मात्र गेल्या 2009 पासून महापालिकेने टॅक्स चलन अर्थात कर पावती देणे बंद केले आहे. त्यामुळे आमची गैरसोय होण्याबरोबरच आम्हाला प्रचंड चिंता लागून राहिली आहे. यासंदर्भात आम्ही वेळोवेळी महापालिकेच्या महसूल खात्याकडे टॅक्स चलानची मागणी करूनही त्याची दखल घेण्यात आलेली नाही. आमची समस्या आमदार अभय पाटील यांनी गेल्या 1 मार्च 2021 रोजी तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांच्या निदर्शनास आणून देत आम्हा दुकानदारांना कोणताही दंड न करता तात्काळ चलन वितरित करण्याचे निर्देश दिले होते. त्यावेळी त्यांनी आमची फाईल पुढील कार्यवाहीसाठी महसूल विभागाकडे सुपूर्द केली होती. मात्र तेंव्हापासून आजपर्यंत त्यासंदर्भात कोणतीच प्रतिक्रिया मिळालेली नाही. तरी या प्रकरणाचे गांभीर्य आणि त्यामुळे आमच्या चरितार्थावर होणारा परिणाम लक्षात घेऊन कृपया आपण जातीने लक्ष घालून आम्हाला आमचे टॅक्स चलन उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी, अशा आशयाचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे. निवेदन सादर करतेवेळी पी. डी. सकपाळ, एस. एम. रेडकर आदींसह नाथ पै सर्कल रोड, शहापूर येथील संबंधित त्रस्त दुकानदार उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.