दिल्ली संमेलनात सहभागी होणाऱ्या कवींना शुभेच्छा

0
1
Poetess
 belgaum

बेळगाव लाईव्ह : दिल्लीत होणाऱ्याअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बेळगावच्या नवोदित कवींना सन्मानाने निमंत्रित करण्यात आले आहे. तेथे कविता सादर करण्यासाठी जाणाऱ्या कवींना बेळगाव साहित्य परिषदेच्या वतीने शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम झाला.

दिल्लीच्या तालकोटरा स्टेडियममध्ये मराठी साहित्यातील नवोदित कवींना आपल्या काव्यप्रतिभेचे सादरीकरण करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. सीमाकवी रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली बेळगावच्या १६ नवोदित कवी या साहित्य संमेलनात सहभागी होणार आहेत.
या शुभेच्छा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुधीर चव्हाण होते. प्रास्ताविक एम. के पाटील यांनी केले. या संमेलनात सीमाकवी रवींद्र पाटील, प्रा. मनिषा नाडगौडा, डॉ. संजीवनी खंडागळे, स्मिता किल्लेकर, अस्मिता आळतेकर, रोशनी हुंद्रे, सुवर्णा पाटील, शीतल पाटील, व्यं. कृ. पाटील, अपर्णा पाटील, प्रतिभा सडेकर, विमल सुरेश पाटील, रोहिणी रवींद्र पाटील, मानसी रवींद्र पाटील आणि पूजा राजाराम सुतार हे कवी आपल्या रचनांद्वारे मराठी अस्मितेचा जागर घडवणार आहेत. पुष्प देऊन या सर्व कवींना शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी परिषदचे जिल्हाध्यक्ष सुधीर चव्हाण नवोदित कवींना मार्गदर्शन करताना म्हणाले, “सीमाभागातील मराठी अस्मिता जपणाऱ्या कविता मंचावर दुमदुमल्या पाहिजेत” .Poetess

 belgaum

शिवसंत संजय मोरे हे नवोदित कवींना सीमाप्रश्नावर काव्याचा जागर करण्याचे आवाहन केले , तर रणजीत चौगुले मराठी संस्कृती आणि भाषेची महती अधोरेखित करत कवींच्या संवेदनशीलतेचे कौतुक करून सदिच्छा दिल्या.यावेळी परिषदेचे उपाध्यक्ष डी. बी. पाटील, एम. के. पाटील आणि मोहन अष्टेकर यांनीही कवींना विशेष शुभेच्छा दिल्या.

या ऐतिहासिक संमेलनामुळे बेळगावच्या मराठी साहित्य चळवळीला नवे बळ मिळणार असून नवोदित कवींना आपल्या प्रतिभेला राष्ट्रीय स्तरावर सादर करण्याची सुवर्णसंधी प्राप्त होणार आहे!दिल्लीच्या व्यासपीठावरून बेळगावच्या नवोदित कवींना मराठीचा अभिमान उंचावण्याची आणि सीमाभागातील मराठी अस्मितेचा बुलंद आवाज देशभर पोहोचवण्याची संधी मिळणार आहे!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.