बेळगाव लाईव्ह : सौंदत्ती येथील श्री क्षेत्र रेणुका यल्लम्मा देवीच्या यात्रेसाठी भरत पौर्णिमेच्या निमित्ताने देवी दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी प्रशासनाच्या वतीने सुव्यवस्थित रचना केली आहे. एकाच दिवसात सुमारे १० लाख भाविक मंदिरात येऊन दर्शन घेत आहेत. भक्तांना त्रास होऊ नये म्हणून प्रवेश आणि निर्गमना बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र रस्ते तयार करून ट्रॅफिक नियंत्रण केले जात आहे, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले.
सौंदत्ती येथील श्री रेणुका यल्लम्मा मंदिराला बुधवारी भेट देऊन तेथील मूलभूत सुविधांची तपासणी केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना वरील माहिती दिली आहे.
चाकडी गाडी, जीप, टेंपो, ट्रॅक्टर, बाइक, कार, बस यासह सर्व वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था केली आहे. सुमारे १५०० पोलीस आणि गृहरक्षक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. जिल्हा प्रशासकीय मंत्री, पर्यटन मंत्री, पर्यटन मंडळाचे अध्यक्ष आणि या भागातील आमदारांच्या सल्ल्यानुसार विविध भागांतून येणाऱ्या नागरिकांसाठी व्यवस्था केली आहे, असे ते म्हणाले.
याशिवाय, पहिल्यांदाच मंडळ आणि प्रशासनाच्या वतीने भक्तांसाठी मज्जिगे दासोह (छाट) केला आहे. पुढील वर्षी दासोह भवन बांधण्याची योजना आखली आहे. तिरुपती आणि धर्मस्थळ यांच्या मॉडेलवर व्यवस्था उभारण्यासाठी तयारी सुरू आहे. आधीच निधी उपलब्ध असून, टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कामाला सुरुवात होईल.
गुरे-ढोरांसाठी चाऱ्याची कमतरता होऊ नये याची काळजी घेतली आहे. पार्किंग आणि ट्रॅफिक ही मुख्य समस्या होती. चाकडी गाडी आणि इतर वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था केली आहे.
गुणवत्तापूर्ण व्यवस्था उभारण्यासाठी प्रशासन आणि पर्यटन मंडळाकडून योजना तयार केली जात आहे. जोगुळबावी, उगरगोळ आणि सौंदत्ती
रस्त्यांतून येणाऱ्या वाहनांसाठी थेट पार्किंगकडे जाण्यासाठी रस्ते चिन्हांकित केले आहेत. यामुळे ट्रॅफिक नियंत्रणास मदत होत आहे, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले.
विविध भागांतून येणाऱ्या भक्तांसाठी प्रामुख्याने पार्किंग, लाइटिंग आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. देवळाच्या आजूबाजूच्या रस्त्यांवर लोक वाहने पार्क केल्यामुळे ट्रॅफिक समस्या निर्माण होत होती, त्यासाठी १५ टोइंग वाहनांद्वारे पार्क केलेली वाहने हलवली जात आहेत.
मंदिराच्या बाजूच्या रस्त्यांवर कोणत्याही वाहनांची पार्किंग परवानगी दिलेली नाही. रस्त्यांवरील दुकाने रद्द केली आहेत. यामुळे देवळाच्या आजूबाजूला चांगले स्वच्छ वातावरण निर्माण झाले आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले.