बेळगाव लाईव्ह :चोरट्यांनी घरासमोर पार्क केलेल्या दोन हिरो होंडा प्लस मोटरसायकली लंपास केल्याच्या घटना बेळगाव तालुक्यातील अलतगा आणि कलखांब -मुचंडी येथे घडल्या आहेत.
चोरीला गेलेल्या हिरो होंडा प्लस मोटरसायकलींपैकी एक मोटरसायकल (क्र. केए 22 एचएल 2338) ही तानाजी गल्ली, अलतगा (ता. बेळगाव) येथील प्रतीक कृष्णा चौगुले यांच्या मालकीची तर दुसरी मोटरसायकल (क्र. केए 22 एचएल 6770) ही कलखांब-मुचंडी (ता. बेळगाव) येथील कलाप्पा मनोहर पाटील यांच्या मालकीची आहे.
गेल्या 8 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 9 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेदरम्यान चोरट्यांनी घरासमोर पार्क केलेल्या उपरोक्त मोटरसायकली लंपास केल्या आहेत.
याप्रकरणी काकती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.