बेळगाव लाईव्ह :केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाने कर्नाटक शहर पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण मंडळाच्या बेळगाव विभागातील 32 शहरी भागांसाठी अमृत 2.0 योजनेअंतर्गत 836.45 कोटी रुपये मंजूर केले आहेत. केंद्र सरकारकडून 50 टक्के, राज्य सरकारकडून 40 टक्के आणि सार्वजनिक योगदानातून 10 टक्के असा मिळणारा हा निधी 50:40:10 या प्रमाणात वितरित केला जाईल, अशी माहिती राज्यसभेचे खासदार इरण्णा कडाडी यांनी दिली.
याव्यतिरिक्त मुडलगी, नागनूर, कल्लोळी, अरभावी आणि घटप्रभा या जुळ्या शहरांना सतत पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी 165 कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत. अनेक प्रकल्प आधीच सुरू आहेत उर्वरित लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे.
अमृत योजनेअंतर्गत बेळगाव विभागासाठी मंजूर निधी अनेक गावांसाठी राखीव ठेवण्यात आला असून तो पुढील प्रमाणे आहे. मच्छे, पिरनवाडी : रु.85 कोटी, हारुगेरी आणि मुगळखोड : रु.51.94 कोटी, कित्तूर : रु.25.21 कोटी, एम. के. हुबळी : रु.18.09 कोटी, हुक्केरी : रु.9.63 कोटी, चिंचली : रु.23.90 कोटी, रायबाग : रु.22.83 कोटी खानापुर : रु.20.52 कोटी, ऐनापूर : रु.14.13 कोटी, एकसंबा : रु.16.36 कोटी, अथणी : रु.47.67 कोटी, कंकणवाडी : रु.14.84 कोटी, कुडची : रु.18.62 कोटी, संकेश्वर : रु.11.74 कोटी,
मुनवळ्ळी : रु.39.11 कोटी, अंकलगी -अक्कतंगेरहाळ : रु.42.26 कोटी, बोरगाव : रु.19.98 कोटी, घटप्रभा, कल्लोळी, नागनूर, मुडलगी : रु.165.44 कोटी (सतत पाणी पुरवठ्यासाठी), कागवाड, शेडबाळ, उगारा खुर्द : रु.66.74 कोटी, कलकुरा : रु.22.25 कोटी, रामदुर्ग : रु.19.56 कोटी, यरगट्टी : रु.29.14 कोटी, कोन्नूर : रु.19.67 कोटी, निप्पाणी : रु.32.83 कोटी.
- सध्या अनेक ठिकाणी काम सुरू झाली असून ज्यामुळे या भागात सुधारित शहरी पायाभूत सुविधा आणि पाणीपुरवठा सुनिश्चित झाला आहे. खासदार इरण्णा कडाडी यांनी सदर निधी सुरक्षित करून त्याची अंमलबजावणी करण्याचे संपूर्ण श्रेय केंद्रीय शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल खट्टर आणि कर्नाटक राज्याचे शहरी विकास मंत्री भैरती सुरेश यांना दिले.


