Friday, January 31, 2025

/

जलसंवर्धनासाठी सर्व खात्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची -डी. व्ही. स्वामी

 belgaum

बेळगाव लाईव्ह: ‘पाण्याचे संरक्षण अर्थात जलसंवर्धन हा जलशक्ती अभियानाचा मुख्य उद्देश आहे. तेंव्हा संबंधित सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी हे अभियान यशस्वी करण्यासाठी हातात हात घेऊन एकजूट झाले पाहिजे, असे केंद्रीय जलशक्ती अभियानाचे नोडल अधिकारी डी. व्ही. स्वामी यांनी सांगितले.

बेळगाव जिल्हा पंचायत सभागृहामध्ये आज गुरुवारी सकाळी आयोजित जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या जलशक्ती अभियानाच्या मान्सूनपूर्व प्रगती आढावा बैठकीत ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.

जलसंवर्धनाबरोबरच पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरवून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवणे. पर्यायाने पारंपारिक व इतर जलस्तोत्राची क्षमता वाढवणे, पाणलोट व सामाजिक वनीकरणाच्या कामांना प्राधान्य दिले गेले पाहिजे. ही कामे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत केली जावीत.

 belgaum

जलशक्ती अभियानांतर्गत विविध ठिकाणी जाऊन अधिकाऱ्यांनी तेथील भूजल पातळी तपासली पाहिजे. पावसाळ्यात शाळा, कॉलेजेस सरकारी कार्यालय यांच्या इमारतीवरील पाण्याचे संकलन करण्याच्या दृष्टीने कामे हाती घेतली जावीत. पाण्याचे संकलन आणि संवर्धन करण्यासाठी प्रामुख्याने कृषी, फलोत्पादन आणि सामाजिक वनीकरण खात्यांनी पुढाकार घ्यावा वगैरे सूचना केंद्रीय जलशक्ती अभियानाचे नोडल अधिकारी डी. व्ही. स्वामी यांनी बैठकीत केल्या.

बैठकीस सेंट्रल ग्रँड मोटार बोर्ड च्या वैज्ञानिक सुचेतना बिश्वास, योजना संचालक रवी एन. बंगारपन्नावर यांच्यासह कृषी, फळबागायत, अरण्य भूगर्भ, लघु पाटबंधारे, ग्रामीण पेयजल व निर्माल्य खाते, जिल्हा पंचायत पंचायत, राज अभियांत्रिकी खाते वगैरे संबंधित विविध खात्यांचे जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.