Sunday, January 19, 2025

/

हिंडलग्याच्या पोरांनी जिंकली विराट ट्रॉफी 2025

 belgaum

बेळगाव लाईव्ह : रविवारी सुट्टीच्या दिवशी खचाखच भरलेल्या धर्मवीर संभाजी उद्यानात हजारो प्रेक्षकांची मने जिंकत नील बॉईज हिंडलगा या संघाने एस आर एस हिंदुस्थान संघाचा आठ गडी राखून पराभव करत पॅरी स्पोर्ट्स आयोजित विराट ट्रॉफीवर 2025 वर आपले नाव कोरले. या क्रिकेट चषकामुळे पुन्हा एकदा बेळगाव शहरातील मध्यवर्ती भागातील धर्मवीर संभाजी उद्यानात खंड पडलेल्या क्रिकेट स्पर्धांना पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे रविवारी या स्पर्धेची यशस्वी सांगता झाली.

रविवारी दुपारी अंतिम सामना खेळवला गेला त्यात प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 8 षटकात केवळ 28 धावा केल्या. प्रत्युत्तर दाखल खेळताना नील बॉइज हिंडलगा संघाने केवळ पाच षटकात दोन गड्यांच्या 29 धावांचे उद्दिष्ट सहजरीत्या पूर्ण केले आणि पहिल्यांदाच विराट क्रिकेट ट्रॉफी जिंकली.

मागील वर्षी विराट ट्रॉफी जिंकलेला एसआरएस हिंदुस्थान संघाला मात्र यंदा उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ, श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, शहर समितीचे कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील, नगरसेविका वैशाली भातकांडे, सामाजिक कार्यकर्ते पवन जुवेकर, प्रणय शेट्टी आदींच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले.

स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन एस आर एस हिंदुस्थानच्या हिंदुस्थान चेतन पांगिरेची तर बेस्ट फिल्डर म्हणून नील बॉईज हिंडलगा संघाचे नारायण यांची निवड करण्यात आली स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून नील बॉईज संघाच्या सुशांत कोवाडकर याला बक्षीस देण्यात आले . तर सामनावीर आणि मालिकावीर हा पुरस्कार हिंडलगा संघाचा तनिष्क नाईक याची निवड करण्यात आली.Virat

तनिष्क याला सायकल आणि रोख पंधरा हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. विजेत्या निल बॉईज हिंडलगा संघाला संघाला 66 हजार 666 तर उपयोजित पद मिळवलेल्या एस आर एस हिंदुस्थान संघाला 44 हजार 444 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक ट्रॉफी देण्यात आली.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पॅरि स्पोर्ट्स संघाच्या पदाधिकाऱ्यांनी, आणि विराट हॉटेलचे मालक कपिल भोसले आणि सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.