बढती नंतर बनले ऑनररी लेफ्टनंट

0
12
Lieutenant
 belgaum

बेळगाव लाईव्ह : प्रबळ इच्छाशक्ती अन् प्रचंड मेहनतीच्या जोरावर लष्करात कार्यरत असलेल्या सांबरा येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील जवानाने ऑननरी लेफ्टनंट पदापर्यंत झेप घेतली आहे.

भुजंग महादेव चिंगळी असे या जवानाचे नाव. बेळगावच्या मराठा सेंटरमध्ये प्रजासत्ताकदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात सेंटर कमाडंट ब्रिगेडीअर जॉयदीप मुखर्जी यांच्या हस्ते पदोनत्ती प्रदान करून भुजंग चिंगळी यांचा सन्मान करण्यात आला.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत त्यांनी मोठ्या धडपडीतून लष्करी सेवेत प्रवेश मिळविला. 1997मध्ये ते जवान म्हणून बेळगावच्या मराठा सेंटरमध्ये सैन्यात दाखल झाले.

 belgaum

सुरवातीच्या काळात ते शिपाई म्हणून रुजू झाले होते. त्यानंतरच्या काळात नाईक, हवालदार, नायब सुभेदार, सुभेदार अशा एकेक पायऱ्या यशस्वीपणे पार करत त्यांनी ऑननरी लेफ्टनंट पदापर्यंत बढती मिळाली आहे.

Lieutenant
तब्बल 28 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत त्यांनी बेळगांव, अरुणाचल प्रदेश, लेह, पुणे, लद्दाक, आसाम, पंजाब, ग्वा्लीयर, हिमाचल प्रदेश आदी प्रतिकूल वातावरण असलेल्या ठिकाणी समर्थपणे आपली सेवा बजाविली आहे. वडील कै. महादेव चिंगळी, आई बाळाबाई, भाऊ महेश यांची प्रेरणा, पत्नी उषा यांची साथ आणि युनिटमधील वरिष्ठ अधिकारांच्या मार्गदर्शनातून हे यश साध्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.

भुजंग चिंगळी यांचे प्राथमिक शिक्षण सांबरा येथील सरकारी मराठी प्राथमिक शाळेत, माध्यमिक शिक्षण सांबरा येथील जनता विद्यालयात तर महाविद्यालयीन शिक्षण बेळगावच्या मराठा मंडळमध्ये झाले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.