पन्नास वर्षांनी भेटले ठळकवाडी शाळेचे विद्यार्थी…

0
6
School
 belgaum

बेळगाव लाईव्ह – साउथ कोकण एज्युकेशन सोसायटी संचलित ठळकवाडी हायस्कूलच्या 1974 -75 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा सुवर्ण महोत्सवी पुनर्मिलन सोहळा प्रजासत्ताक दिनी संपन्न झाला. या कार्यक्रमात हायस्कूलचे विद्यमान मुख्याध्यापक श्री आर आर कुडतुरकर आणि शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.

या अविस्मरणीय मेळाव्याची सुरुवात कुडतुरकर सर, दीपक परुळेकर, एस के इ सोसायटीचे नितीन करमली, जयंत दीक्षित, महादेव चौगुले व अशोक देसाई यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली.

उपस्थित प्रत्येक विद्यार्थ्याने आपला परिचय करून देऊन शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि या पुनर्मिलनाबद्दल आनंद व्यक्त केला. जुने मित्र आणि सहकारी पन्नास वर्षानंतर भेटल्याने वातावरण अतिशय आनंददायी बनले होते. शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना माजी विद्यार्थ्यांच्या वतीने मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला आणि प्रत्येक विद्यार्थ्याला भेटवस्तू देण्यात आली. या भेटवस्तूचे प्रयोजकत्व नितीन करमली व दीपक परुळेकर यांनी केले होते. याप्रसंगी आशुतोष मनोहर व इतरानी आपल्या शाळेबाबत, शिक्षकांनी केलेल्या संस्काराबाबत कृतज्ञता व्यक्त केली.

 belgaum

School
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रताप पवार ,महादेव चौगुले, नितीन करमली, विवेक देसाई व सुरेंद्र मेहंदरगे वगैरेंनी परिश्रम घेतले. उपस्थित 45 हून अधिक विद्यार्थ्यांमध्ये मुंबई, पुणे, बेंगलोर, गोवा व ऑस्ट्रेलियाहून खास आलेला दीपक परुळेकर आदी माजी विद्यार्थ्यांचा समावेश होता.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रताप पवार यांनी केले तर रामकृष्ण दाते यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रगीत आणि दिवंगत शिक्षक व विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.