बेळगाव लाईव्ह :देशासाठी राहुल गांधी सत्याची लढाई लढत आहेत. भाजपा सरकारने त्यांना ईडी केस घालून वेगवेगळ्या ठिकाणी अनेकदा त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी देखील ते घाबरणार नाहीत. त्यांची विचारधारा सामान्य दिन दलित आणि दुबळ्यांना न्याय मिळवून देण्याची आहे. भाजप आणि आरएसएस ची विचारधारा भित्र्यांची आहे. आमची परंपरा हुतात्मा देणाऱ्यांची आहे जेलमधून बसून चिठ्ठी लिहिणाऱ्यांची नाही प्रसंगी आम्ही जीव देऊ शकतो अशी टीका वायनाडच्या खासदार काँग्रेसने त्या प्रियांका गांधी यांनी व्यक्त केले.
बेळगाव येथील सीपीएड् मैदानावर काँग्रेस अधिवेशन अंतर्गत आज ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ या घोष वाक्याखाली राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. व्यासपीठावर कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस प्रभारी केसी वेणूगोपाल, काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला, कर्नाटक काँग्रेस अध्यक्ष डी के शिवकुमार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी हे न्याय, समानता आणि लोकशाही टिकवण्यासाठी लढत आहेत. ते ज्यावेळी लोकसभेत बोलायला थांबतात वेळी सत्ताधारी पक्ष राहुल गांधी यांना बोलायला संधी देत नाही. राहुल गांधी यांना भाजपची भीती वाटते ते सत्याची लढाई लढत आहेत, असा घणाघाती आरोप काँग्रेस नेत्या आणि वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी यांनी केला.
मंगळवारी बेळगाव शहरातील सीपीएड मैदानावर ‘जय बापू जय भीम, जय संविधान’ या काँग्रेसच्या राष्ट्रीय अभिमानाची सुरुवात केल्यानंतर त्या बोलत होत्या. आपल्या भाषणाची सुरुवात त्यांनी कन्नड भाषेतून केली. यावेळी बोलताना त्यांनी संविधान धोक्यात असून संविधानाचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे ठाम मत व्यक्त केले.
त्या पुढे म्हणाल्या.आरएसएस संविधान विरोधी आहेत. तिरंग्याला मानणारे नाहीत. ते कधी तिरंग्याला अशोक मानतात, तिरंग्याचा अपमान करतात. आरक्षण कमजोर करण्याचा सत्ताधारी पक्षाचा प्रयत्न आहे. केंद्रातील भाजप सरकारने सीबीचा कायदा बदलला. लोकपाल बिलाला कमकुवत केले. निवडणूक आयोगाला शक्तीने बनवले. ज्या राज्यात महिलांवर हल्ले होतात त्या हल्ले करणाऱ्यांचे रक्षण केले. कामगार कायदा बदलला. त्याच्यातील शक्ती काढली. शेतकऱ्यांचे नुकसान केले.
ज्यावेळी 700 शेतकरी आंदोलनात शहीद झाले, त्यावेळी शेतकऱ्यांच्या विरोधातला कायदा माघारी घेतला. अशा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात संविधानाला वाचवण्यासाठी प्रत्येक सामान्य माणसाने विचार करण्याची गरज आहे. जीवनात संविधानाचा आपल्याशी संबंध काय आहे? राजकीय पक्ष आरोप प्रत्यारोप करत आहेत. अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा संविधानाकडे सामान्य माणसाच्या जीवनात का गरज आहे याचा सुद्धा विचार करण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या.
संसदेत थांबून ज्या देशाचे गृहमंत्री खुलेआम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करतात, अशा सरकारकडून काय अपेक्षा ठेवणार? असा सवाल ही प्रियांका गांधी यांनी केला 1947 च्या नंतर असा संविधानाचा अपमान कोणत्याही सरकारने केला नाही.
हा लोकशाहीचा, संविधानाचा, शहिदांचा अपमान आहे. हा बाबासाहेबांचा एकट्याचा नाही तर देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसेनानींचा, देशातील नागरिकांचा अपमान आहे. ज्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिला समानतेचा प्रस्ताव ठेवला होता, त्यावेळी आरएसएसच्या विचारधारेच्या लोकांनी विरोध केला होता.
बाबासाहेबांचे पुतळे जाळले होते. 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान बदलण्याची भाषा करणारे भाजपचे लोक होते. त्यांना जनतेने धडा शिकवला त्यामुळेच मोदी घाबरले आणि मोदींनी संविधान सभागृहात डोक्यावर घेतले असा घणाघाती आरोपही त्यांनी केला. आमची परंपरा हुतात्म्यांची आहे. संविधान वाचवण्यासाठी प्रसंगी बलिदान देऊ. मात्र, ब्रिटिशांविरुद्ध जेलमध्ये राहून चिठ्ठी लिहून माफी मागणारे आम्ही नव्हे असा टोलाही त्यांनी लगावला.