Saturday, January 11, 2025

/

शहरातील पोल्ट्री कचऱ्याची उचल ठप्प! : दुकानदारांची आमदारांकडे धाव

 belgaum

बेळगाव लाईव्ह : पोल्ट्रीच्या कचऱ्याची गेल्या दोन-तीन दिवसांपासून उचलत न झाल्यामुळे त्रस्त झालेल्या शहरातील पोल्ट्री दुकानदार आणि व्यापाऱ्यांनी आज शनिवारी सकाळी आमदार असिफ (राजू) सेठ यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्याद्वारे पोल्ट्री कचऱ्याची समस्या त्वरित निकालात काढण्याची मागणी केली.

बेळगाव महापालिकेकडून शहरातील पोल्ट्री दुकानदार आणि व्यापाऱ्यांकडील पोल्ट्रीच्या कचऱ्याची उचल करून विल्हेवाट लावली जाते. तथापि गेल्या दोन-तीन दिवसांपासून पोल्ट्रीच्या कचऱ्याची उचल करण्यात आलेली नाही. त्यामुळे अस्वच्छता व दुर्गंधी पसरत असल्यामुळे पोल्ट्री दुकानदार व व्यापाऱ्यांना आपला व्यवसाय करणे कठीण झाले आहे. या संदर्भात त्रस्त झालेल्या शहरातील पोल्ट्री दुकानदार व व्यापाऱ्यांनी आज शनिवारी सकाळी ऑल बेलगाम पोल्ट्री शॉप कीपर्स अँड ट्रेडर्स असोसिएशनच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्तांना निवेदन सादर करण्याबरोबरच बेळगाव उत्तरचे आमदार असिफ (राजू) सेठ यांची देखील भेट घेऊन त्यांनाही निवेदन सादर केले.

तसेच पोल्ट्री कचऱ्याची समस्या त्यांच्यासमोर मांडली. तेंव्हा आमदारांनी समस्या जाणून घेऊन तिचे त्वरेने निवारण करण्यात केले जाईल असे आश्वासन देऊन पोल्ट्री दुकानदार व व्यापाऱ्यांना दिलासा दिला. शहरातील पोल्ट्री दुकानदार व व्यापाऱ्यांकडे पोल्ट्रीच्या कचऱ्याची उचल गेल्या काही दिवसापासून बंद झाली आहे परिणामी साचून राहिलेल्या या कचऱ्यामुळे गैरसोय निर्माण होण्याबरोबरच दुकानदार व्यापारी तसेच परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

असे दिसून आले आहे की कसाईखाना सारख्या मोठ्या ठिकाणच्या कचऱ्याची नियमित उचल केली जात आहे फक्त शहरातील लहान दुकानदारांच्या कचरा उचलणे बंद करण्यात आले आहे. तेेंव्हा जर पोल्ट्री दुकानदारांनी आपल्याकडील साचलेला कचरा शहरात कोठेही टाकल्यास त्यांना जबाबदार धरले जाऊ नये. तरी याची गांभीर्याने दखल घेऊन शहरातील पोल्ट्री दुकानदार व व्यापाऱ्यांकडे साचलेल्या पोल्ट्री कचऱ्याची त्वरित उचल करून स्वच्छतेला प्राधान्य द्यावे अशा आशयाचा तपशील निवेदनात निवेदनात नमूद आहे.Garbage इस

बेळगाव लाईव्हला माहिती देताना ऑल बेलगाम पोल्ट्री शॉप कीपर्स अँड ट्रेडर्स असोसिएशनचे हुसेफ बागलकोटी बेळगाव महापालिकेकडून गेल्या तीन-चार दिवसांपासून आमच्या पोल्ट्रीच्या कचऱ्याची उचल करण्यात आलेली नाही. त्या संदर्भात आज आम्ही बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार राजू सेठ यांच्याकडे निवेदन सादर करून तक्रार करण्यास आलो आहोत असे सांगितले. आमचा पोल्ट्रीचा कचरा ज्या ठिकाणी टाकला जातो तो डम्पिंग झोन बंद असल्यामुळे आमच्याकडील कचऱ्याची उचल केली जात नसल्याचे समजते. असे जर असेल तर आम्ही आमचा पोल्ट्रीचा कचरा कोठे टाकायचा याची सूचनाही आम्हाला देण्यात आलेली नाही. दुसरीकडे महापालिका आमच्याकडील कचऱ्याची उचल ही करत नाही. सध्या आमच्याकडे दोन-तीन दिवसाचा पोल्ट्री कचरा साचून आहे त्याची त्वरित उचल न झाल्यास मोठी समस्या निर्माण होणार आहे.

तथापि उद्यापासून आमच्या कचऱ्याची उचल केली जाणार असल्याचे कळते आमदार साहेबांनी देखील तऱ्हेने आमच्याकडील कचऱ्याच्या समस्येचे निवारण केले जाईल असे आश्वासन दिले आहे, असे बागलकोटी यांनी सांगितले. याप्रसंगी आसिफ मुजावर, प्रशांत भादवणकर, तौसीफ मोमीन, मुदस्सर मुल्ला, हमीद बागलकोटी, उझैफ बागलकोटी आदी पोल्ट्री दुकानदार व व्यापारी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.