बेळगाव लाईव्ह : म्हादई योजनेसाठी केंद्रीय पर्यावरण आणि वन्यजीव मंत्रालयाने पुढील दोन महिन्यांत मंजुरी द्यावी, अशी मागणी कर्नाटकमधील कॅबिनेट मंत्री एच. के. पाटील यांनी केली आहे. तसेच, त्यांनी भाजपावर राजकारण करण्याचे आरोप केले.
कायदामंत्री एच. के. पाटील यांनी म्हादई योजनेंच्या संदर्भात केंद्रीय पर्यावरण आणि वन्यजीव मंत्रालयाकडून मंजुरी मिळवण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी दिला आहे. तुम्ही मंजुरी न दिल्यास, आम्ही पुढील निर्णय घेऊ, असे ते म्हणाले. केंद्र सरकार आशेच्या विरुद्ध कार्य करत आहे, आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे मुद्दे पुन्हा समोर येतील, अशी टीकाही त्यांनी केली.
म्हादईबाबत भाजपकडून राजकारण सुरु असल्याचा आरोप करत भाजपाच्या राजकारणावर टीका केली, म्हादई बैठकीचा मुद्दा उचलताना भाजप नेते इतर मुद्यांवर बोलतात. यामध्ये नेत्यांच्या धोरणांमध्ये चुकांचे निशान आहेत, असे त्यांनी सांगितले. आगामी दोन महिन्यांत म्हादई योजना मंजूर न झाल्यास, आम्ही दुसरे पाऊल उचलू असा इशाराही त्यांनी दिला.
पक्षातील अंतर्गत मतभेदांवर व्यक्त होताना ते म्हणाले. आम्ही शिस्तबद्व पणे रहात असून पक्षात कोणत्याही प्रकारचा गोंधळ नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 21 जानेवारी रोजी होणाऱ्या ‘गांधी भारत’ कार्यक्रमाचे समर्थन करत सर्व कार्यकर्त्यांना हा कार्यक्रम यशस्वी पद्धतीने पार पाडण्याचे आवाहन केले. आमचे सर्व आमदार व कार्यकर्ते या कार्यक्रमात भाग घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ईडीने ३०० कोटी रुपयांच्या मालमत्तेवर जप्ती केल्याबद्दल बोलताना ते म्हणाले, ईडीने मुडा घोटाळ्यात ३०० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केल्याचे प्रेस रिलीज जारी करणे हे खूप आश्चर्यकारक आहे. बेळगावमध्ये आयोजित गांधी भारत कार्यक्रमात तोडफोड करण्यासाठी हे करण्यात आले.
ईडीला प्रेस रिलीज जारी करण्यास कोणी सांगितले? तुम्हाला तुमचे काम करावे लागेल. त्यांना चौकशी करू द्या आणि न्यायालयात आरोपपत्र दाखल करू द्या. त्याऐवजी पत्रकारांवर खटला दाखल करणे हे राजकीयदृष्ट्या प्रेरित पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले.