बेळगाव लाईव्ह :दरवर्षी प्रमाणे महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने कै. श्रीनिवास केशवराव म्हापसेकर यांच्या स्मरणार्थ *आदर्श शाळा पुरस्कार २०२४-२५* देण्यात येणार आहेत,
बेळगाव शहर, बेळगाव तालुका ग्रामीण विभाग आणि खानापूर तालुक्यातील एकूण पाच मराठी प्राथमिक शाळांना आदर्श शाळा पुरस्कार देण्यात येतील, तरी विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेल्या प्राथमिक शाळांकडून आदर्श शाळा पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
पुरस्कारासाठी निकष आणि नियम
★ यामध्ये बेळगाव शहर, बेळगाव तालुका आणि खानापूर तालुक्यातील सर्व मराठी प्राथमिक शाळा अर्ज करू शकतात.
★विविध शैक्षणिक उपक्रम राबवून आपल्या शाळेचे वेगळपण राखणे.
★विद्यार्थ्यांच्या पटसंख्या वाढीसाठी केलेले प्रयत्न
★शाळा इमारत, बैठक व्यवस्था, मैदान इतर सोईसुविधा यांच्या सुधारणेसाठी राबविलेले विविध उपक्रम
★शाळेच्या माध्यमातून राबविण्यात येणारे सामाजिक, पर्यावरण पूरक, आरोग्य विषयक उपक्रम याची माहिती.
★मराठी भाषा, संस्कृती,परंपरा ,वाचन संस्कृती विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी राबविण्यात येणारे उपक्रम
★शाळेचा शैक्षणिक दर्जा आणि पाल्याच्या विकासाबाबत समाधानी पालकांचे मनोगत.
तरी पुरस्कारासाठी शाळा मुख्याध्यापक/ शाळा सुधारणा समिती यांनी ५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत अर्ज करावेत असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने करण्यात येत आहेत.
संबंधित अर्ज महाराष्ट्र एकीकरण युवा समिती कार्यालय,
कावळे होस्टेल टिळकवाडी, बेळगाव येथे स्वीकारले जातील.
अधिक माहितीसाठी संपर्क
अंकुश केसरकर(अध्यक्ष)
97399 63229
श्रीकांत कदम(सरचिटणीस) 9611756529