Monday, January 20, 2025

/

काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी स्मृतींचा उत्सव

 belgaum

बेळगाव लाईव्ह : 1924 साली महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली बेळगाव येथे पार पडलेल्या ऐतिहासिक काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी स्मृतीनिमित्त, बेळगावच्या सुवर्ण विधानसौध आवारात महात्मा गांधी यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण मंगळवारी (21 जानेवारी) सकाळी 10:30 वाजता होणार आहे.

सुवर्ण विधानसौधच्या उत्तर प्रवेशद्वारासमोर उभारण्यात आलेल्या या भव्य पुतळ्याचे अनावरण राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते होईल. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील. याशिवाय उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, विधानसभेचे सभापती यू. टी. खादर, विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहतील. यासह प्रवास आणि पर्यटन मंत्री एच. के. पाटील, लोकनिर्माण मंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते चलवादी नारायणस्वामी, खासदार जगदीश शेट्टर, विश्वेश्वर हेगडे कागेरी, प्रियंका जारकीहोळी तसेच स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांचे कुटुंबीयही या कार्यक्रमात सहभागी होतील.Gandhi

याच कार्यक्रमादरम्यान, माहिती व जनसंपर्क विभागाद्वारे प्रकाशित “गांधी भारत-मरुनिर्माण” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या पुस्तकामध्ये 1924 च्या काँग्रेस अधिवेशनातील महात्मा गांधींच्या भाषणांचे आणि घेतलेल्या निर्णयांचे संकलन आहे. हे पुस्तक मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे.

महात्मा गांधी पुतळ्याची वैशिष्ट्ये:
उंची: 25 फूट
वजन : 20 टन
निर्मिती खर्च: 4.83 कोटी रुपये
साहित्य: पंचधातू
कलाकार: म्हैसूर येथील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी ही भव्य मूर्ती घडवली आहे.

या ऐतिहासिक स्मृती सोहळ्यामुळे बेळगाव शहर पुन्हा एकदा महात्मा गांधी आणि त्यांच्या विचारांना उजाळा देण्यासाठी सज्ज झाले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.