Sunday, January 19, 2025

/

संतविचार आणि समकाल विषयावर व्याख्यान

 belgaum

बेळगाव लाईव्ह -सार्वजनिक वाचनालय, बेळगाव या संस्थेच्यावतीने आयोजित केलेल्या ५० व्या बॅ. नाथ पै व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प रविवार दि. १९-०१-२०२५ रोजी एसीपीआर सभागृह, गुरुदेव रानडे मंदिर, हिंदवाडी, बेळगाव येथे सांगोला येथील ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांनी ‘संतविचार आणि समकाल’ या विषयावर गुंफुले.

आपल्या एक तासाच्या व्याख्यानात त्यांनी संत परंपरेचा धावता आढावा घेतला. जातीपातीच्या प्रथा आजही जरी मानल्या जात असल्या तरीही पंधराव्या शतकात संतांनी जातीपाती झुगारून जे कार्य केले आहे त्याबद्दल त्यांनी मौलिक विचार व्यक्त केले.

व्याख्यानाच्या प्रारंभी सार्वजनिक वाचनालयाच्या कार्यवाह सुनिता मोहिते यांनी प्रास्ताविक केले वाचनालयाचे अध्यक्ष आनंद लाड यांनी स्वागत केले त्यानंतर गुरुदेव रानडे मंदिराचे प्रमुख एडवोकेट एम बी जिरली यांनी दीप प्रज्वलन करून आजच्या व्याख्यानाचा प्रारंभ केला. अनंत लाड यांच्या हस्ते बंडगर महाराज व ॲड एम बी जिरली यांचा पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. व्यासपीठावर वाचनालयाचे उपाध्यक्ष डॉक्टर विनोद गायकवाड, सहचिटणीस अनंत जांगळे हेही उपस्थित होते. वाचनालयाचे संचालक प्रसन्न हेरेकर यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर महाराज हे मुळचे सांगोला (सोलापूर) येथील असून त्यांची किर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते आणि संतसाहित्याचे अभ्यासक म्हणून सर्वत्र ओळख आहे. त्यांनी विविध संतांविषयी लेखन केले आहे आणि संत साहित्यावर अनेक ठिकाणी व्याख्याने दिलेली आहेत.

ते वै. भोजलिंग महाराज घेरडीकर महाराज यांचे नातू आहेत. यापूर्वी त्यांनी बेळगावात दिलेले व्याख्यान सर्वांना आवडलेले होते. रविवारच्या या व्याख्यानाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड, कार्यवाह सुनिता मोहिते व संचालक मंडळाने केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.