Wednesday, January 29, 2025

/

मीनाक्षी बैलूरकर खानापूर नगराध्यक्ष पदी

 belgaum

बेळगाव लाईव्ह : खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध झाली असून नगराध्यक्ष पदासाठी मीनाक्षी बैलूरकर व उपनगराध्यक्ष पदी जया भूतकी यांची निवड झाली आहे.

सोमवारी सकाळी निवडणुक अर्ज भरण्याची वेळ सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 पर्यंत होती. परंतु नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी मीनाक्षी बैलूरकर व जया भूतकी यांचे प्रत्येकी एकेकच अर्ज दाखल झाल्याने, निवडणूक अधिकारी तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी दुपारी 3.00 वाजता ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. व नगराध्यक्षपदी मीनाक्षी बैलूरकर तर उपनगराध्यक्षपदी जया भूतकी यांची निवड झाल्याचे सांगितले.

निवड जाहीर होताच त्या ठिकाणी उपस्थित असलेले खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी निवड झालेल्या दोघांनाही पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या व खानापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, आमदार या नात्याने, नगरपंचायतीला लागेल ते सर्वतोपरी सहकार्य व सहाय्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी महालक्ष्मी मल्टीपर्पज सोसायटीचे संचालक विठ्ठल करंबळकर, मुख्य व्यवस्थापक तुकाराम हुंद्रे व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या.Khanapur

 belgaum

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर खानापूर नगरपालिका निवडणूक प्रक्रियेला गती

गेल्या वर्षभर उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या या प्रकरणाला आता तोडगा मिळाल्याने स्थानिक पातळीवर नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष नागरिकांच्या सेवेसाठी कार्यभार सांभाळणार आहेत.

खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक 26 ऑगस्ट 2024 रोजी घोषित करण्यात आली होती. दरम्यान, खानापूरचे कॉंग्रेस नगरसेवक लक्ष्मण मादार यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावत आरक्षणासंदर्भात मागणी केली होती. इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरु असताना निवडणुकीला वेग आला असतानाच सदर नगराध्यक्ष- उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीला हायकोर्टाने स्थगिती दिली होती.

यानंतर 5 महिन्यांनी अखेर उच्च न्यायालयाने स्थगिती रद्द करून निवडणुकीला परवानगी दिली असून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होणाऱ्या निवडणुकीत नगरपालिकेच्या नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू होणार आहे.

 

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.