बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरामध्ये एका रियल इस्टेट व्यावसायीकावर गोळीबार करण्यात आल्याची खळबळजनक घटना आज शुक्रवारी पहाटे गणेशपूर बेनकनहळ्ळी परिसरात घडली.
शाहूनगर येथील व्यावसायिक शीटर प्रफुल पाटील याच्यावर हा गोळीबार झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. बेनकनहळळी येथून आज शुक्रवारी पहाटे कार गाडीमधून निघालेल्या व्यावसायिक गोळीबार करून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
तथापि हल्लेखोंनी झाडलेल्या गोळ्या कारगाडीच्या खिडकीच्या काचेला लागल्यामुळे सुदैवाने रावडी शीटरचे प्राण वाचले आहेत.
प्राण वाचले तरी बंदुकीच्या गोळीमुळे फुटलेल्या काचा चेहऱ्याला, कपाळाच्या एका बाजूला लागल्याने संबंधित रावडी शीटर जखमी झालाआहे.
त्याला उपचारासाठी एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सदर गोळीबाराची घटना बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत घडली आहे.