बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा आघाडीतर्फे उद्या बुधवार दि. 15 जानेवारी 2025 रोजी दुपारी 2 वाजता मराठा मंदिर रेल्वे ब्रिज येथे भारतीय सैन्य दलात भरती झालेल्या युवक -युवतींच्या भव्य जाहीर सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
खानापूर रोड, बेळगाव येथील मराठा मंदिर सभागृहामध्ये होणाऱ्या या समारंभात देश सेवेसाठी लष्कर, सीमा सुरक्षा दल, हवाई दल, नौदल वगैरे भारतीय संरक्षण दलाच्या विविध विभागात भरती झालेल्या बेळगाव तालुक्यातील युवक -युवतींना सन्मानित केले जाणार आहे.
तरी या जाहीर सत्कार सोहळ्याला हितचिंतकांसह नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून शोभा वाढवावी, असे आवाहन बेळगाव तालुका समिती युवा आघाडीचे अध्यक्ष राजू किणेकर , सचिव शंकर कोनेरी यांनी केले आहे.