बेळगाव लाईव्ह : खासदार आणि माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी बेळगावात अन्न तंत्रज्ञान व व्यवस्थापन संस्थेची स्थापना करण्याची मागणी केली.
खासदार आणि कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. त्यांनी बेळगावात अन्न तंत्रज्ञान व व्यवस्थापन संस्थेची (Food Technology and Management Institute) स्थापना व्हावी, अशी मागणी केली.
याआधी शेट्टर यांनी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांची भेट घेऊन संस्थेच्या स्थापनेसाठी आवश्यक प्रस्ताव सादर केला होता. या मागणीनुसार अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे सादर केला आहे8
. या प्रस्तावाला मंजुरी देऊन शेतकरी, मध्यमवर्गीय, ग्राहक तसेच या क्षेत्रातील नागरिकांना सुविधा मिळाव्यात, अशी विनंती शेट्टर यांनी अर्थमंत्री सीतारामन यांच्याकडे केली.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत बेळगावात अन्न तंत्रज्ञान व व्यवस्थापन संस्थेची स्थापना करण्यासाठी प्रस्तावाला मंजुरी देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती जगदीश शेट्टर यांनी पत्रकार परिषदेत दिली.