Thursday, January 16, 2025

/

सीमाप्रश्नी आंदोलनाला खासदार शाहू महाराज यांचा पाठिंबा

 belgaum

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण समितीने १७ जानेवारी रोजी कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या आंदोलनाला खासदार शाहू महाराज यांचा पाठिंबा मिळाला आहे. सीमाप्रश्न सोडवण्यासाठी ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील समितीत चर्चा करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी कोल्हापूर मुक्कामी होणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा मिळवण्यासाठी खासदार शाहू महाराजांची भेट घेतली. गुरुवारी समिती नेते आर. एम. चौगुले आणि नगरसेवक रवी साळुंखे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शाहू महाराजांची भेट घेतली. या भेटीत सीमाप्रश्नी समितीने  शुक्रवारी हुतात्मा दिनी पुकारलेल्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन शाहू महाराजांना करण्यात आले.

समितीने सादर केलेले निवेदन स्वीकारून खासदार शाहू महाराज यांनी सांगितले की, समितीच्या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली सीमाप्रश्नी नेमण्यात आलेल्या समितीत मी सदस्य असून, या समितीत सीमाप्रश्न सोडवण्यासाठी चर्चा करणार आहे. सीमावासीयांच्या न्याय्य मागण्यांसाठी मी कायम पाठिंबा देईन. याशिवाय, समितीच्या शिष्टमंडळाने खासदार धैर्यशील माने आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून त्यांच्या पाठिंब्याचे आश्वासन मिळवले.Mes

कोल्हापूरमधील भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांच्या स्थानिक नेत्यांचीही भेट घेऊन समितीने या आंदोलनाला सर्वपक्षीय पाठिंबा मिळवला आहे विशेषता भाजप ग्रामीण अध्यक्ष नाथाजी पाटील, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, महानगर अध्यक्ष विजय जाधव, मंत्री हसन मुश्रीफ मनसे शहर प्रमुख दिंडोरले, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांचीही भेट घेतली आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने दैनिक पुढारीचे  ज्येष्ठ संपादक प्रताप सिंह जाधव यांचीही कोल्हापूर मुक्कामी भेट घेत पुढील सीमा लढ्यात अग्रभागी होण्याची विनंती केली आहे. जाधव यांनी आपण सीमा लढ्यात सक्रियरित्या सहभागी राहू असे आश्वासन दिले आहे.

एन.के. कालकुंद्री,युवा समितीचे सरचिटणीस श्रीकांत कदम,  निपाणी तालुका म. ए. समिती अध्यक्ष अजित पाटील, कार्याध्यक्ष बंडा पाटील, युवा समितीचे उपाध्यक्ष गुंडू कदम आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.