Tuesday, January 7, 2025

/

बंदी झुगारत भाजपकडून धर्म. संभाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावचे जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासनाने मूर्ती अनावरण कार्यक्रम लांबणीवर टाकला असला तरी भाजप कार्यकर्त्यांनी अनगोळ येथील छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा अनावरण केला. प्रचंड पोलीस बंदोबस्त तणावाच्या वातावरणात आणि किरकोळ वादावादीचा प्रसंग वगळता हा सोहळा रविवारी शांततेत पार पडला.

गेल्या आठवडाभरापासून अनगोळ छत्रपती संभाजी महाराज चौकातील छत्रपती संभाजी महाराजांचा महापालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या पुतळ्याच्या अनावरणावरून वाद सुरू होता. त्यामुळे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन शहर पोलीस प्रमुख याडा मार्टिन मार्बन्यांग त्यांनी शनिवारी रात्री प्रत्यक्ष पाहणी करून पुतळा अनावरण सोहळा लांबणीवर टाकला होता. पण या पुतळ्याच्या अनावरणासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापौर सविता कांबळे उपमहापौर आनंद चव्हाण व भाजप नगरसेवक आग्रही होते. त्यामुळे आज पुतळा अनावरण होणार की नाही याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. अखेर जिल्हा प्रशासनाच्या सूचना दूर करून भाजप कार्यकर्त्यांनी पुतळा अनावरण केला.

रविवारी दिवसभर प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अनगोळ नाक्यापासून धर्मवीर संभाजी महाराज चौकापर्यंत सर्व गल्ल्या बॅरिकेट्स उभारून बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

संध्याकाळी महापौर सविता कांबळे उपमहापौर आनंद चव्हाण यांनी पुतळा स्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी महापालिका अधीक्षक अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांनी पुतळ्यासमोरील अडथळे हटवण्यास नकार दिला. त्यामुळे काही काळ वादावादी झाली. अखेर महापौर सविता कांबळे यांनी स्वतः अडथळे दूर केले. संध्याकाळी सातच्या सुमारास मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे अनगोळ नाका या ठिकाणी आगमन झाले. त्या ठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. तेथून धर्मवीर संभाजी चौकापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. या मिरवणुकीत ढोल ताशे, कलशधारी सुहासिनी आणि भगवेध्वज घेऊन युवती सहभागी झाल्या होत्या. मोठ्या उत्साहात हे मिरवणूक काढण्यात आली.Angol

अनगोळ ग्रामस्थ आणि श्रीराम सेना हिंदुस्तानचा विरोध

छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे अनावरण सोहळा लांबणीवर टाकावा अशी मागणी करत काही दिवसांपासून श्रीराम सेना हिंदुस्तान ग्रामस्थ आणि काही पंचांनी मागणी केली होती.

त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून अनावरण सोहळा लांबणीवर टाकला होता. पण रविवारी पोलीस बंदोबस्तात अनावरण सोहळा होत असल्यामुळे श्रीराम सेना हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांनी कुरबर गल्ली कोपऱ्यावर जोरदार घोषणाबाजी करून विरोध केला. उपायुक्त शेकऱ्याप्पा यांनी या कार्यकर्त्यांची समजूत काढून त्यांना माघारी धाडले. त्यामुळे किरकोळ वादावादी वगळता पुतळा अनावरण शांततेच झाले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.