बेळगाव लाईव्ह – सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 50 व्या बॅरिस्टर नाथ पै व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प सोमवारीं जेष्ठ अभिनेते प्रसाद पंडित यांनी गुंफले “माझा नाट्यप्रवास” या विषयावर बोलताना त्यांनी आपल्या हायस्कूल जीवनात शिवाजी महाराजांच्या जीवनातील अफजलखानाचा वध याप्रसंगापासून नाट्य क्षेत्रातील पदार्पण कसे झाले तेव्हापासून अनेक नाटकात त्यांच्या भूमिका कशा गाजल्या याचे महत्त्व त्यांनी विशद केले.
बाप्पा शीरवईकर यांनी आपल्यातील अभिनव कला हेरून कसे मार्गदर्शन केले त्यानंतर प्रभाकर पणशीकर, मधुकर तोडरमल, राजा गोसावी यांच्याबरोबरच्या भूमिका कशा गाजल्या याची अतिशय रंजक माहिती त्यानी सांगितली. कलाकाराची निरीक्षण शक्ती जबरदस्त असली पाहिजे तरच तो आपल्या कलेमध्ये यशस्वी होऊ शकतो असेही ते म्हणाले. केवळ 45 सेकंदाच्या चित्रपटातील भूमिकेसाठी किती यातना सहन कराव्या लागल्या पण त्यातून त्यांच्यातील कलाकार कसा घडत गेला याचेही कथन त्यांनी केले.
वाचनाचे अध्यक्ष अनंत लाड यांनी त्यांचे पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले. उपाध्यक्ष विनोद गायकवाड यांनी त्यांचा परिचय करून दिला आणि संचालक रघुनाथ बांडगी यांनी आभार प्रदर्शन केले. नेताजी जाधव यांनी सूत्रसंचालन केले.
प्रमुख पाहुणे मधुरा हॉटेलचे संचालक मधु बेळगावकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. त्यांचा सन्मान डॉक्टर गायकवाड यांनी केला.
यावेळी व्यासपीठावर कार्य व सुनीता मोहिते व सह कार्यवाह अनंत जांगळे हेही उपस्थित होते.
खचाखच भरलेल्या सभागृहात अनेक वेळा टाळ्यांचा गडगडाट ऐकू येत होता.
बॅरिस्टर नाथ पै व्याख्यानमालेत मंगळवारी प्रा.युवराज पाटील
बेळगाव सार्वजनिक वाचनालय आयोजित पन्नासाव्या बॅ नाथ व्याख्यानमालेतील मंगळवार दिनांक 21 जानेवारी रोजी चौथे पुष्प गुंफण्यासाठी युवा व्याख्याते प्रा युवराज पाटील यांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांचा अल्प परिचय पुढील प्रमाणे
ते लोकराजा शाहू ॲकॅडमी ची संस्थापक असून लेखक,प्रेरणादायी वक्ता,म्हणून संपुर्ण महाराष्ट्रात परिचित आहेत.
मानसशास्त्र,मराठी व इतिहास हे त्यांचे अभ्यासविषय असून एम सी इ डी कोल्हापूर व पुणे येथे व्यक्तीमत्व विकासाच्या कार्यशाळेतील मार्गदर्शक म्हणून काम पाहत आहेत.
पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र राज्य येथे साधन व्यक्ती म्हणून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पाणी व स्वच्छता या विषयावर तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले आहे.
‘स्पीड ब्रेकर’ व ‘चंद्रप्रकाशाच्या झळा’ ‘टेन्शन फ्री व्हा’! या बेस्ट सेलर पुस्तकांचे लेखन त्यांनी केले असून या तिनही पुस्तकांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
प्रबोधन क्षेत्रातील कार्यास अनेक पारितोषिके व पुरस्कार प्राप्त झाली आहेत.
महाराष्ट्रात व कर्नाटक मध्ये अनेक महत्वाच्या व्यासपीठावर महत्त्वाच्या सामाजिक विषयांवर हजारो लोकांचे प्रबोधन केले आहे.
दुरदर्शन,आकाशवाणी कोल्हापूर येथे युवकांसाठी मार्गदर्शन केले असून
डॉ.डी.वाय.पाटील स्कूल ऑफ इंजिनीअरींग लोहगाव पुणे येथे पाच वर्षे विद्यार्थी समुपदेशक म्हणून काम पाहीले आहे.
“तणाव मुक्त व्हा” या विषयावरील त्यांचे व्याख्यान असल्याने नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे