Wednesday, January 22, 2025

/

उडपीचा विघ्नेश ठरला राज्यस्तरीय ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’!

 belgaum

बेळगाव लाईव्ह :सतीश जारकीहोळी फाउंडेशनच्यावतीने कर्नाटक असोसिएशन ऑफ बॉडी बिल्डर्स संघटनेने बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशन, गोकाक व चिक्कोडी तालुका बॉडी बिल्डिंग असोसिएशन यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या 11व्या सतीश शुगर क्लासिक -2024 या भव्य बक्षीस रकमेच्या राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेतील ‘सतीश शुगर क्लासिक -2024 चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ हा मानाचा किताब (टायटल) उडपीच्या विघ्नेश याने हस्तगत केला. स्पर्धेतील उपविजेता उडपीचाच चरणराज हा ठरला.

चिक्कोडी (जि. बेळगाव) येथील आर. डी. हायस्कूलच्या मैदानावर उपरोक्त राज्यस्तरीय स्पर्धा नुकतीच गेल्या सोमवारी 16 डिसेंबर रोजी मोठ्या दिमाखात यशस्वीरित्या पार पडली.

आयबीबीएफच्या नियमानुसार विविध 7 वजनी गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत राज्यभरातील मातब्बर शरीर सौष्ठवपटुुंनी भाग घेतला होता. स्पर्धेतील टायटल विजेत्या चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स उडपीच्या विघ्नेश याला आकर्षक भव्य करंडकासह 1,50,000 रुपयांचे पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. उपविजेत्या चरणराज याला चषकासह 60,000 रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.Body building

त्याचप्रमाणे स्पर्धेच्या प्रत्येक गटातील पहिल्या पाच क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे 15000, 14000, 13000, 12000 व 11000 रुपयांचे पारितोषिक दिले गेले. बक्षीस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून महावीर मोहिते, प्रभाकर कोरे, शिवा पाटील, मांजरेकर, किरण रजपूत, अर्जुन नाईकवाडी, रियाज चौगुला, नागराज कोलकार आदी उपस्थित होते.Body building

स्पर्धेसाठी पंच म्हणून अजित सिद्दन्नावर, नीलकंठ, जी. डी. भट, गंगाधर, हेमंत हावळ, रमेश कल्लमनी, कातेश गोकावी, सुनील पवार, सुनील राऊत, अनंत लंगरकांडे, कावळे, सचिन मोहिते, नूर मुल्ला, अश्विन निंगन्नावर, शेखर जानवेकर, अक्षय हुलीयार, आसिफ कुसगल, शंकर पिलाई, सलीम गवर व कृष्णा चिक्कतुंबळ यांनी काम पाहिले.

11व्या सतीश शुगर क्लासिक 2024 राज्यस्तरीय स्पर्धेचा गटवार अंतिम निकाल (अनुक्रमे पहिल्या पाच क्रमांकाचे विजेते स्पर्धक यानुसार) पुढील प्रमाणे आहे. 55 किलो वजनी गट : संदेश कुमार (उडपी), गजानन गावडे (बेळगाव), कृष्णप्रसाद (उडपी), उमेश गंगणे (बेळगाव), विजय एस. जडगौडर (धाडवाड). 60 किलो गट : शशीधर नाईक (उडपी), विशाल आर. निलजकर (बेळगाव), सुमंत (उडपी), रेनॉल्ड डिसोजा (मंगळूर), उदय मुरकुंबी (बेळगाव). 65 किलो गट : धीरज कुमार (उडपी), अभिलाष (उडपी),

बसाप्पा कोणकरी (बेळगाव), झाकीर हुल्लुर (धारवाड), सोमशेखर खारवी (उडपी). 70 किलो गट : विघ्नेश (उडपी), लोकेश पटेल (शिमोगा), व्यंकटेश ताशिलदार (बेळगाव), मंजुनाथ आर. कोल्हापुरे (बेळगाव), आशिष (उडपी).

75 किलो गट : वरूणकुमार जी.व्ही.के. (दावणगिरी), नरेंद्र मडिवाळ (बेळगाव), कुमार (उडपी), प्रताप कालकुंद्रीकर (बेळगाव), राहुल कुलाल (बेळगाव). 80 किलोवरील वजनी गट : चरणराज (उडपी), अश्वत सुजान (मंगळूर), गिरीश मॅगेरी (धारवाड), मोहम्मद नूरमुल्ला (चित्रदुर्ग), व्ही. बी. किरण (बेळगाव).

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.